

Sant Janabai Abhang
esakal
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
माझं जातं फिरतं गं
विठ्ठला तुझ्या हातानं
असं कसं मी म्हणावं
मीच त्याला फिरवलं
संत जनाबाईंच्या एका चरित्राचं मुखपृष्ठ पाहताना हे शब्द सुचले. जनाबाई म्हटल्यावर दळण-कांडण करणारी जनी आणि हे कष्ट हलके करणारा विठ्ठल हेच चित्र आपल्या डोळ्यासमोर स्वाभाविकपणे उभं रहातं. कारण अर्थातच विठ्ठलाने जातं फिरवलं, जनीची वेणी-फणी केली, अशी शब्दचित्र आपल्या परिचयाची आहेत. जसं, ‘झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणि॥’ पण विठ्ठलाची कामं इथेच संपत नाहीत, तर विठ्ठल जनाबाईंचा लेखनिकही आहे आणि त्याचं वर्णन जनी मोठ्या अभिमानानं करतेय. आणि या अभंगात कोणाचे लेखनिक कोण हेही ती सांगतेय.