सह्याद्रीचा माथा : आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठ आणि आपण...

Devendra Fadanvis & Yoga
Devendra Fadanvis & Yogaesakal
Updated on

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलीकडेच ‘विवेदा’ या नाशिकलगतच्या बेझे गावाजवळील वेलनेस व्हीलेजमध्ये आले होते. या कार्यक्रमाचं अचूक निमित्त साधून वेलनेस व्हीलेजचे सर्वेसर्वा किरण चव्हाण यांनी नाशिकला आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठ व्हायला हवं, अशी मागणी श्री. फडणवीस यांच्याकडे केली होती. श्री. फडणवीस यांनीदेखील या मागणीचा सकारात्मक पद्धतीनं विचार करू, अशी ग्वाही उपस्थितांसमोर दिली. नाशिकसाठी अशा प्रकारची मागणी करण्याची ही सध्याची सर्वोत्तम वेळ आहे. ही वेळ श्री. चव्हाण यांनी साधली, याचं कौतुक करावंस वाटतं. सध्याची वेळ सर्वोत्तम का आणि आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठाच्या स्थापनेतून नेमकं काय साधता येईल, याचा थोडक्यात प्रस्तावनारूप धांडोळा घेणं सयुक्तिक ठरतं. हे विद्यापीठ साकार झाल्यास नाशिक आणि खानदेशचा सर्वाधिक फायदा होईल, हे मात्र नक्की... (saptarang latest marathi article by dr rahul ranalkar on International Yoga University and you nashik news)

Devendra Fadanvis & Yoga
अस्तित्वाची जाणीव

२०१४ मध्ये मोदी सरकार केंद्रात सत्तारुढ झालं. तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वांत पहिलं यश भारताला कुठलं मिळालं असेल, तर ते होतं आंतरराष्ट्रीय योग दिनाचं. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा व्हायला हवा, असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनोमध्ये मांडला आणि या प्रस्तावाला विक्रमी प्रतिसाद मिळत १९५ देशांनी तो स्वीकारला. मेमध्ये सत्तेत आल्यानंतर लगेचच आपल्या देशाला मिळालेलं हे मोठं यश होतं. वास्तविक योग संपूर्ण जगानं एकमुखानं स्वीकारला, याला आपल्या परंपरेची मोठी पार्श्वभूमी आहे.

स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यांच्यापासून ते आत्तापर्यंतच्या अनेक दिग्गज योगप्रेमी आणि योगऋषींनी योग जगभर पोचवला होता. त्यामुळे या प्रस्तावाला तुर्कस्तान वैगरे अपवाद सोडला, तर अन्य कोणीही विरोध केला नाही. आता आठ वर्षांनंतर योगविषयक मोठी क्रांती जगभर होताना दिसून येते. सध्या जगभरात भारतीय योग प्रशिक्षकांना मोठी मागणी आहे. खासकरून कोविडनंतर जीवनशैलीजन्य आजारांबद्दल जागरूकता वाढत असताना योग अधिकाधिक व्यापक स्वरूप धारण करत आहे.

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Devendra Fadanvis & Yoga
बेटांचा जीव मुठीत

योग विषयाचा प्रस्तावनारूपी धांडोळा यासाठी गरजेचा आहे की एका लेखात, पुस्तकात हा विषय मांडणं अशक्य आहे. योग जीवनशैली म्हणून स्वीकारण्याकडे जगभरात कल वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या मानसिकविकार ग्रस्तेतून समाजाला, जगाला बाहेर काढण्याची क्षमता योग ज्ञानामध्ये आहे. शालेय स्तरापासून ते महाविद्यालयीन पातळीपर्यंत आणि मध्यमवयीन स्त्री-पुरुषांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना यथायोग्य जीवनशैली योगातून आत्मसात करता येऊ शकते. जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, सीमा यांच्यापलीकडे जाऊन योगज्ञान जाणून घेण्याची आज अत्यंत गरज आहे. त्यात नाशिकचं योगदान लाभत असेल, तर त्याहून मोठी कुठली गोष्ट असू शकेल...? योग विद्या धामचं मुख्यालय नाशिकमध्ये आहे.

विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये योग विद्या धामकडून बनविण्यात आलेला योग अभ्यासक्रम स्वीकारला गेला आहे. ही नाशिकसाठी भूषणावह बाब आहे. लोणावळा येथील कैवल्यधाम, सांताक्रूज येथील द योगा इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून योगविषयक ज्ञान जिज्ञासूंना दिलं जातं. बिहार स्कूल ऑफ योगामध्ये देखील जगभरातून योगसाधक प्रशिक्षणासाठी येत असतात. परंतु, सध्या योग विषय जाणून घेण्यासाठी जिज्ञासूंची संख्या पाहिली, तर सध्या असलेल्या संस्थांचं योगदानही अपुरं पडेल, अशी स्थिती आहे.

Devendra Fadanvis & Yoga
माणसं जोडणारी पदयात्रा

नाशिकमध्ये सर्वसमावेशक असे आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठ निर्माण झाल्यास नाशिक आणि महाराष्ट्राच्या लौकिकात निश्चितच भर पडेल. राज्यच नव्हे, तर देशासाठी ही भूषणावह बाब ठरेल. विविध संस्थांच्या माध्यमातून योगविषयक सर्टिफिकेट्स दिली जातात. नियमित विद्यापीठांमध्ये योगविषयक पदविका, पदवी, पीएच.डी. करण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र वैद्यकीय महाविद्यालय जशी नाशिकमधील आरोग्य विद्यापीठाशी संलग्न आहेत. त्याप्रमाणे देशभरातील आणि जगातील योग संस्था या आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठाला जोडता येऊ शकतील.

एक समान योगविषयक अभ्यासक्रम एकाच वेळी त्या माध्यमातून लागू करता येईल. किंबहुना आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठाची वेगवेगळी शिबिरे विविध देशांमध्येही सुरू करता येणं शक्य आहे. योग परंपरा ही तशी गुरू-शिष्य परंपरेशी निगडित आहे. काही संप्रदायदेखील या योग परंपरेत निर्माण झाले आहेत. जेवढे विषय एका छत्राखाली आणता येतील, तेवढे आणून आंतरराष्ट्रीय मानांकन, अॅक्रिडेशन योग प्रशिक्षकांना देता येईल. सध्या अॅक्रिडेशनची सोय आपल्याकडे आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून केलेली आहे. ज्या विविध योग परंपरा आहेत, त्यांचे स्वतंत्र विभाग आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठात स्थापन झाल्यास त्या माध्यमातून या योगपरंपरांचे शास्त्रशुद्ध जतन करता येईल.

त्यामुळे महाराष्ट्राने पुढाकार घेतल्यास, श्री. फडणवीस यांनी रुची दाखविल्यास ही संकल्पना साकारली जाणं शक्य आहे. आपण जर हे करू शकलो नाही, तर अन्य एखाद्या युरोपिय अथवा अमेरिका खंडातील देशात आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठ स्थापन होईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. नंतर मग पुढच्या काही वर्षांत परदेशातून योग प्रशिक्षक भारतात येऊन भारतीयांना योगज्ञान देतील किंवा योग विषयातील उच्च शिक्षणासाठी आपल्याला परदेशात जाणं भाग पडेल... पुढे पुढे आपणदेखील अप्रूप मानत गोऱ्या लोकांकडून योग शिकण्यास सुरवात करू...

Devendra Fadanvis & Yoga
चळवळींच्या माहेरघरी साहित्यिकांचा मेळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com