Sanjay Raut, Dr Bharati Pawar, Dinkar Anna Patil
Sanjay Raut, Dr Bharati Pawar, Dinkar Anna Patilesakal

सह्याद्रीचा माथा : राऊत, बंडाची चर्चा, भारतीताई आणि अण्णा

महापालिकेच्या निवडणुका नेमक्या कधी होतील, हे सांगणं अजूनही कठीण आहे. प्रभागरचनेविषयी अजून संभ्रम आहे. राजकीय पक्षांना सोयीची रचना असावी, असा प्रयत्न सत्ताधारी गट नेहमीच करत असतो. मात्र या प्रक्रियेवर काही कोटींचा खर्च झालेला असतो. त्यामुळे नव्याने प्रभागरचना करायची झाल्यास पुन्हा खर्च करावा लागेल. या सगळ्या परिस्थितीमुळे महापालिका निवडणुकांसाठी एप्रिल-मे उजाडू शकतो. निवडणुका जेवढ्या लांबतील तेवढं कार्यकर्त्यांना सांभाळणं राजकीय पक्षांसाठी कठीण जाणार आहे. हा धोका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी जास्त आहे.

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची घालमेल होणं, त्यामुळे अत्यंत स्वाभाविक आहे. कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सहानुभूती मिळू नये, याची वाट त्यासाठीच शिंदे गट आणि भाजपला पाहावी लागणार आहे. स्थानिक पातळीवरच्या घडामोडी काहीही असल्यातरी निवडणूक नियोजनासाठी सतत अॅक्शन मोडवर असल्याने भाजपने लोकसभेची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याकडे नाशिक लोकसभेची जबाबदारी सोपवून भाजपनं नाशिकमध्ये ठोस पायाभरणीचे प्रयत्न सुरू केले आहेत. (saptarang Latest Marathi Article by dr rahul ranalkar on politics nashik news)ही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

नाशिकमध्ये १२ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार या बातमीनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांची झोप उडाली. संजय राऊत यांचा नाशिक दौरा झाला. या दौऱ्यात बंडोबा थंडोबा झाल्याचं सांगण्यात येऊ लागलं. प्रत्यक्षात बंड तूर्त थांबलंय की थांबवण्यात आलंय, यावर आता विचारमंथन सुरू झालं आहे. पक्ष मग तो कोणताही असो, कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सध्याच्या परिस्थितीत स्थानिक नेत्यांना मोठी मागणी आहे. व्यवहार निपुण लोक चाचपणी करत आहेत.

दरम्यान, पक्ष नेमका कोणाचा, यावर कोर्टात बाजू मांडली जात आहे. जेवढा वेळ जाईल तेवढं डॅमेज वाढेल, हे स्पष्ट आहे. चिन्हावरची लढाई अजून संपलेली नाही. राजकीय नेते, कार्यकर्ते द्विधा मनःस्थितीत आहेत. १२ माजी नगरसेवकांच्या प्रवेशाची चर्चा रंगत असली तरी ही संख्या वाढूदेखील शकते, असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील प्रमुख पदाधिकारी सध्या डोळ्यांत तेल घालून कार्यकर्ते आणि नेत्यांवर नजर ठेवून आहेत.


हेही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

Sanjay Raut, Dr Bharati Pawar, Dinkar Anna Patil
चीन कोरोनाग्रस्तच का?

लोकसभा निवडणुकांची तयारी दुसरीकडे सुरू झाली आहे. यात भाजपनं आघाडी घेतली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. त्यामुळे नाशिक शिवसेनेकडे तर दिंडोरी भाजपकडे, अशी स्थिती होती. आता भाजपनं सर्वच लोकसभा जागांसाठी पायाभरणीचं काम सुरू केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नाशिक लोकसभेची जबाबदारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे असेल. शिवसेनेच्या शिंदे गटाशी लोकसभेत युती होईल न होईल, हे आत्ताच सांगणं कठीण आहे. पण भाजपनं व्यूहरचना आखून ते मार्गस्थ झालेत. महाविकास आघाडी देखील लोकसभेत एकत्र लढेल की नाही, हे अस्पष्ट आहे. त्यामुळे सामने कसे रंगतील, हे स्पष्ट नसलं तरी देखील पायाभरणीचं काम सगळ्याच पक्षांना दमदारपणे करावं लागणार आहे.

भाजपकडून लोकसभेसाठी नावांची चाचपणी सुरू झाली आहे. यात सर्वांत पुढे असलेलं नाव म्हणजे दिनकरअण्णा पाटील. तशी नावांची कमतरता भाजपत नाही. अन्य पक्षातील नावांचाही विचार भाजपत गांभीर्यानं होतो. मात्र दिनकर पाटील ज्या पद्धतीनं पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम करताहेत, ते लक्ष वेधून घेणारं आहे. भाजपत त्यांचा दांडगा संपर्क आहे. तळागाळात संपर्क यंत्रणा त्यांनी उभारली आहे. भाजपतील काही आमदारांचाही खासदारकीसाठी विचार होऊ शकतो. लोकसभेसाठी तयारी हा सगळ्याच पक्षांसाठी कळीचा मुद्दा आहे. त्यात भाजपला देखील नव्यानं व्यूहरचना आखावी लागणार आहे. बदललेल्या आणि बदलत्या राजकीय समीकरणांची त्याला किनार असेल.

Sanjay Raut, Dr Bharati Pawar, Dinkar Anna Patil
जगण्याचे तत्त्वज्ञान समृद्ध करणारे ज्ञानपीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com