दृष्टिकोन : भारतीय संस्कृतीत सणांचे महत्त्व!

Rajaram Pangavane
Rajaram Pangavaneesakal
Updated on

लेखक : राजाराम पानगव्हाणे

माणसाच्या जीवनात जो शांतपणा, जे स्वास्थ्य असावं लागतं ते आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात तो हरवून बसलेला आहे. सर्व प्रकारचे सण टप्प्याटप्प्याने साजरे करताना नातेसंबंधाची जपणूक, सकारात्मक ऊर्जा, मानवी संबंध, भक्ती, अध्यात्म ऊर्जेचा स्त्रोत मनात शांती, सकारात्मक दृष्टिकोन सणांच्या माध्यमातून निश्चितच निर्माण होतो.

आपल्याकडील सर्व सण-उत्सव पाहिले तर निसर्गाशी नातं सांगणारी, जवळीक असणारी अशीच त्यांची पूर्वापार रचना आहे. अगदी मुक्या प्राण्यांप्रति आदरभाव हा आपल्याच सणांतून व्यक्त होतो. (saptarang latest marathi article by rajaram pangavane on Importance of Festivals in Indian Culture nashik)

विविध प्रकारच्या संस्कृतीने नटलेला आपला देश व आपल्या देशातील प्रत्येक सण यांचे महत्त्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे.

वर्षाच्या सुरवातीपासून तर अगदी अखेरपर्यंत प्रत्येक सणांचे महत्त्व व त्यावेळेस बदलणारे ऋतुमान, होणारा नैसर्गिक हवामानातील बदल याची सांगडसुद्धा या सणांसोबत घातलेली प्रामुख्याने आढळते. आपल्या संस्कृतीतील प्रत्येक धर्म यामागे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं अध्यात्म व शास्त्र जोडलेलं आहे.

आपला भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. अनेक भाषा, धार्मिक विविधता जगाच्या पाठीवर इतर कोणत्याही देशात नाही. येथील निसर्ग पाहण्यासाठी लाखो विदेशी पर्यटक भारताला भेट देत असतात.

हिरवागार, निसर्गसंपन्न भारत म्हणजे सणांची रांगोळी, रंगांची उधळण, की येथील मातीलाही इथल्या संस्कृतीचा गंध येतो. आपण भारतीय आहोत याचा खरंच खूप मनापासून अभिमान वाटतो. खूप धार्मिक, आध्यात्मिक आहोत आपण.

अनेक धर्मांचा संगम आपल्या देशात आहे आणि आपले सण आपल्या विविधतेतील एकतेचे प्रतीक आहेत. धार्मिक, भावनिकदृष्ट्या सणांना आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे.

प्रत्येक सणाचा निसर्गाशी खूप जवळचा संबंध आहे. मकरसंक्रांती या सणाला एकमेकांना तिळगूळ वाटण्याची परंपरा आहे. हिवाळ्याच्या दिवसांत तिळगूळ खाणं आरोग्यासाठी खूप हितकारक असतं.

पर्यावरणपूरक सण-उत्सवांची गरज याचे कारण असे, की माणसाच्या जीवनात जो शांतपणा, जे स्वास्थ्य असावं लागतं ते आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात तो हरवून बसलेला आहे.

सर्व प्रकारचे सण टप्प्याटप्प्याने साजरे करताना नातेसंबंधाची जपणूक, सकारात्मक ऊर्जा, मानवी संबंध, भक्ती, अध्यात्म ऊर्जेचा स्त्रोत मनात शांती, सकारात्मक दृष्टिकोन सणांच्या माध्यमातून निश्चितच निर्माण होतो.

Rajaram Pangavane
श्रमिक महिलांच्या जगात

निसर्गाशी नाते सणांचे

आपल्याकडील सर्व सण-उत्सव पाहिले तर निसर्गाशी नातं सांगणारी, जवळीक असणारी अशीच त्यांची पूर्वापार रचना आहे. मुळात माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. निसर्गात जगता जगता त्याने सृष्टीतील घटनाक्रमात होणारे बदल निरीक्षण करून हळूहळू ओळखले.

निसर्गातील प्रत्येक घटनेमागील नियम शोधण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यांचं आपल्या जीवनाशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला. त्यातून स्वतःला आणि इतरांना मानसिक समाधान, आनंद मिळतो, याची खात्री माणसाला पटली.

एकत्र येण्याने चर्चा, सुसंवाद घडतात. त्यामुळे वैयक्तिक, सामाजिक आणि सामूहिक ताणतणाव हलके होतात, निवळण्यास मदत होते. माणसाचा वैयक्तिक आणि सामूहिक शहाणपणा वाढतो.

समस्यांवर मात करण्याचे बळ, पाठिंबा, उत्साह व प्रेरणा मिळते, असाही त्याला अनुभव आला आणि त्याने मग त्या सर्व सण-उत्सवांची त्या, त्या ऋतुमानानुसार संगती लावली. स्री, पुरुष, आबालवृद्ध यांच्यासाठी सण उत्सवांची विभागणी केली.

सृष्टीतील इतर सजीवांप्रति सतत प्रेम, भूतदया, मैत्रं जपण्याच्या शुद्ध हेतूने त्याने कृतज्ञतेपोटी खास त्यांच्या नावाने सहभागाने सण-उत्सवाचे आयोजन केले. यातून स्वतःचा व समूहाचा आनंद द्विगुणित करण्याचा माणसाने नेहमीच प्रयत्न केला.

भारतीय सणांचे परिपूर्णत्व

वैज्ञानिक महत्त्वासोबतच भारतीय सण सांस्कृतिक, तसेच आध्यात्मिक दृष्ट्याही परिपूर्ण आहेत. इंग्रजी कॅलेंडरनुसार सणांची मांडणी केली तर सुरवात मकरसंक्रांतीपासून होते. याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.

या दिवशी थंडी असल्याने स्वयंपाकात गर्मी देणाऱ्या पदार्थांची चव असते. त्यानंतरचा सण होळी. होळी अन् रंगपंचमी वंसतात बहरून आलेली फुलं आपला रंग उधळू पाहतात. याच रंगात न्हाऊन निर्सगाशी एकरूप करून घेणारा सण म्हणजे धूलिवंदन.

मराठी वर्षाचे सुरवात म्हणजे गुढीपाडवा उभारून केला जातो. गुरुपौर्णिमा भारत वर्षामध्ये जेवढे गुरूला महत्त्व आहे तेवढे कशालाही नाही. गुरूच मार्गदाता अन् मुक्तिदाता. नागपंचमीला नागदेवता व अन्य पशूंसाठी मनात प्रेमाची भावना ठेवणारी हीच ती भारतीय संस्कृती.

Rajaram Pangavane
आखाडाची शिष्यवृत्ती

निसर्गबदलानुसार सणांचे माहात्म्य

श्रावण मास निसर्गातील बदलानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणणे हेच काय ते भारतीय अध्यात्म. नारळी पौर्णिमा समुद्रातील बदलांचे महत्त्व जाणून समुद्रदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण.

रक्षाबंधन भाऊ- बहिणीच्या नात्याचा ऋणानुबंध नातेसंबंधाची जपणूक व्हावी, यासाठीचा हा सण. म्हणजे यामध्ये मानवी संबंधही जपलेले आहे. ऐतिहासिक गोष्टींचे महत्त्व भारतीय सणांमध्ये नेहमीच अनुभवता येते.

पोळा हा मुक्या जिवांविषयी कृतज्ञता भाव, करुणा, प्रेम व्यक्त करतो. घटस्थापना ही धरणीमाता ज्या स्त्रिने शेतीचा शोध लावला तिची आठवण करून तिच्याप्रति कृतज्ञ भाव व्यक्त करणारा सण.

दसरा, दिवाळी, याच महिन्यांत शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे आलेलं असतं. त्याचाच उत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जात असतो.

प्राण्यांप्रति आदरभाव व्यक्त

भारतीय वेदिक परंपरेत सर्व प्राणी, वनस्पती व निसर्गाला देवाचंच रूप मानलं जातं. हाच संदेश आपल्या सणांमधून देण्यात येतो. साप माणसाचे मित्र आहेत. उंदीर जास्त झाले तर शेतीची खूप नासाडी करतात.

त्यांना खाऊन साप आपली नेहेमीच मदत करतात. अशा सापांच्या रक्षणाचं महत्त्व आपल्याला कळावं म्हणून नागपंचमी साजरी केली जाते. आपले लाडके गणपती बाप्पा तर सर्व गणांचे म्हणजे जिवांचे रक्षणकर्ते.

बाप्पांचं डोकं हत्तीसारखं आहे, यावरून आपल्याला हे समजतं, की त्यांची शक्ती व बुद्धी दोन्ही महान आहेत. जंगलातसुद्धा निसर्गाचं संतुलन राखण्यात हत्ती महत्त्वाची कामगिरी बजावतात. म्हणूनच बाप्पांचं रूप असलेल्या हत्तींना आपल्या देशात मारत नाहीत.

झाडे टिकविण्याचा संदेश

पूजेकरता आपण विविध झाडांची पानं-फुलं आणतो. त्यानिमित्ताने सर्व प्रकारची झाडं आपण टिकवून ठेवावी, हा त्यामागचा हेतू आहे. बाप्पांचं वाहन असलेल्या उंदरासारख्या छोट्या प्राण्याचंही निसर्गात स्थान आहेच.

आपले कोळी बांधव पावसाळ्यात मासेमारी करत नाहीत, कारण समुद्र खवळलेला असतो आणि त्या काळात माशांची पिल्लं जन्माला येतात.

पिल्लांनाच आपण पकडून खाल्लं तर पुढच्या वर्षीपासून मासे मिळणारच नाहीत. पिल्लं मोठी झाली आणि समुद्र जरा शांत झाला, की नारळी पौर्णिमा साजरी करून पुन्हा मासेमारी सुरू होते.

दसरा, दिवाळीचा आनंद

दसरा हा सण पावसाळा संपल्यावर येतो. चांगलं पीक येऊन भरपूर धान्य मिळालं म्हणून देवीच्या विविध रूपांची पूजा करून आभार मानले जातात. निसर्गदेवता याच देवीचं एक रूप आहे.

उंदरांना खाऊन धान्याचं रक्षण करणाऱ्या घुबडांनाही लक्ष्मीचं वाहन मानलं जातं. थंडीत दिवस छोटे होऊन रात्री मोठ्या होतात व अनेक झाडांची पानं गळतात.

त्याआधी येणाऱ्या दिवाळीच्या सणात रंगीत आकाशकंदील व मातीच्या पणत्या लावून आणि सुंदर रांगोळ्या काढून थंडी पडण्यापूर्वीचा समृद्ध निसर्ग साजरा केला जातो.

Rajaram Pangavane
रेशमाच्या रेघांनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com