के. एस. आझाद
प्रगत देशात नर्सरी व केजीकडे विशेष लक्ष दिले जाते. अशा शाळांना सरकारी अनुदानही मिळते. विशेष म्हणजे ३ ते ६ या वयोगटाला शिकविण्यासाठी शिक्षिकेजवळ मोठे कौशल्य असावे लागते. ते प्रशिक्षित असावे लागतात.
त्यांचे या विषयावरचे खूप चिंतन असावे लागते. बालकाचे मानसशास्त्र त्यांना माहीत असणे गरजेचे असते. थोडक्यात सांगायचे, तर जसे पहिल्यांदा गाडी चालवायला शिकणे अवघड व धोक्याचे असते. त्याप्रमाणे मूलही नव्याने शिकते, तेव्हा या सर्व गोष्टींचा विचारही शिक्षकाजवळ असावा लागतो. (saptarang latest marathi article on Educorner by k s azad nashik news)
सर्वच क्षेत्रामध्ये महिलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे एकही क्षेत्र नाही, की ज्यात महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेले नाही. गेल्या काही दशकात घरातील चुलीपासून ते अंतराळात झेप घेण्यापर्यंत महिलांचा सहभाग अनेक पटीने वाढला आहे. शिक्षण क्षेत्रही यापासून वेगळे नाही.
एक स्त्री आपलं आपत्याचं जसं पालनपोषण करते. तसेच एक महिला टीचर पुरुषांपेक्षा अधिक योग्य रीतीने मुलांची सर्वांगाने काळजी घेऊ शकते, म्हणूनच प्री-प्रायमरी अथवा प्राथमिक शिक्षणात यामध्ये महिलांची संख्या मुलांना घडविण्यामध्ये लक्षणीय आहे.
प्री-प्रायमरी एज्युकेशन देत असताना महिला ही अधिक जागरूकतेने त्या विद्यार्थ्यांना घडवू शकते. प्री-प्रायमरीमध्ये पुरुष शिक्षकांची संख्या ही अत्यंत दुर्मिळ आहे जवळपास नाहीच. यावरून लक्षात येईल, की विद्यार्थी घडविताना विद्यार्थी जेव्हा उभारी घेतोय, जेव्हा तो उमलतो आहे.
त्या वेळी खऱ्या अर्थाने एक स्त्री म्हणजेच महिला टीचर हीच तिला खऱ्या अर्थाने घडवू शकते. कारण ती आपला आपत्य सांभाळत असताना मुलाच्या रडण्याच्या अथवा हसण्याहून तिला बाळाच्या सर्व खुणा समजत असतात. त्याच अनुभव व कौशल्याचा वापर प्री-स्कूलमध्ये मुलं घडविताना होतो. मुलांमध्ये एकत्र बसणं हेही स्त्री विद्यार्थ्यांना अधिक सक्षमतेने शिकवू शकते.
नवीन मेंदू संशोधन आणि बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे. मूल आपले आपण शिकत असते, मूल खेळातून, अनुभवातून शिकत असते, या तत्त्वाचा आधार घेऊन मुलांना त्यांच्या वेगाने शिकण्यासाठी या मुलांना सहाय्य करणाऱ्या समन्वयकाची भूमिका यासाठी काम करणाऱ्या महिला अधिक योग्य प्रकारे सांभाळू शकते.
मेंदू संशोधनामुळे बालकाच्या मेंदूची ९० टक्के वाढ वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत होत असते. त्यामुळे मेंदू विकासाला पोषक ठरेल, अशा प्रकारे मेंदूची काळजी घेणे हा बालशिक्षणाचा एक मध्यवर्ती भाग आहे. याबाबतची काळजी बालकाच्या नजीकच्या प्रौढांनी म्हणजे आई-वडील, शिक्षक, शेजारी यांनी घेणे अपेक्षित आहे. एकूण शिक्षणाची ही पायाबांधणीची पायरी आहे.
खरंतर तीन ते आठ हे वय माणसाच्या संपूर्ण जीवनाच्या उभारणीची पायाभूत पायरी आहे, असे या बालशिक्षणात काम करणाऱ्या अनेक तज्ज्ञांनी सिद्ध केले आहे. कस्तुरीरंगन आयोगाने हे म्हणणे मान्य करून तीन ते आठ वयोगटासाठी शिक्षणाला पायाभूत शिक्षण म्हणून मान्यता दिली.
खरंतर पूर्व प्राथमिक शिक्षण हे काही कठीण नाही. ते बालकाच्या आवडी-निवडी, कल यानुसारच दिले जाते. बडबड गीते, गाणी, गोष्टी, खेळ यातून मूल शिकत असते. सहजपणे मुळाक्षरे, अंक यांची ओळखही त्याला होते.
यातून त्याला आनंद मिळतो का, हे बघितले पाहिजे. सहजशिक्षण देणाऱ्या शाळेची निवड केली पाहिजे. मुलाला शाळेच्या शिक्षिकेचा धाक, भीती वाटता कामा नये. त्याला तेथे सुरक्षित वाटत असेल, तर त्याची भावी प्राथमिक शिक्षणाची पायाभरणी एकदम छान होते.
महिलावर्ग ही काळजी अत्यंत योग्यपणे घेते. कारण, की आपल्या मुलाचे संगोपन करत असताना तिच्यात अत्यंत सहनशक्ती व धीर हा उपजत निर्माण झालेला असतो. यामुळे प्रथमतः लहान बाळाला मुलांमध्ये बसवणे हे एक जिकिरीचे काम असते. मूल इतर मुलांमध्ये रमते.
सवंगड्यांशी खेळतांना प्रेम, आपुलकी, सहकार्य या गोष्टींचे त्याला ‘सहजशिक्षण’ मिळत जाते. कुटुंबात केवळ त्याला सुरक्षितता मिळते, यापलिकडे फारसे काही मिळत नाही. मुलाला शाळा हे ‘सेकंड होम’ वाटत असेल, तर त्याला पाठवायला काहीच हरकत नाही. पूर्व प्राथमिक शाळेतून बालकाच्या जिज्ञासू वृत्तीची जोपासना होत असेल, तर ते योग्य दिशेने घडते आहे, असे समजावे.
थोर शिक्षणतज्ज्ञ मादाम माँटेसरी बाई यांच्या मते, "बालकाच्या जीवनातील पहिली दोन वर्षे साऱ्या जीवनात अत्यंत महत्त्वाची असतात. बालकाची विकासाची गती या अवस्थेत जास्त असते. तिसऱ्या वर्षापर्यंत ज्ञानेंद्रियांची क्षमता वाढते.
मज्जासंस्थेचा विकास होतो, म्हणून पूर्वप्राथमिक शिक्षणाला खूप महत्त्व आहे. आम्हाला खरोखरीच नवे जग हवे असेल, तर बालकांमध्ये वास करीत असलेल्या गूढ शक्तीचा आपल्याला उपयोग करून घेतला पाहिजे.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
प्रगत देशात नर्सरी व केजीकडे विशेष लक्ष दिले जाते. अशा शाळांना सरकारी अनुदान मिळते. विशेष म्हणजे तीन ते सहा या वयोगटाला शिकविण्यासाठी शिक्षकाजवळ मोठे कौशल्य असावे लागते. ते प्रशिक्षित असावे लागतात.
त्यांचे या विषयावरचे खूप चिंतन असावे लागते. बालकाचे मानसशास्त्र त्यांना माहीत असणे गरजेचे असते. थोडक्यात सांगायचे, तर जसे पहिल्यांदा गाडी चालवायला शिकणे अवघड व धोक्याचे असते. त्याप्रमाणे मूलही नव्याने शिकते, तेव्हा या सर्व गोष्टींचा विचारही शिक्षकाजवळ असावा लागतो.
त्याला त्याचे अध्ययन सुलभ व आनंददायी बनविण्यासाठी ‘सुलभक’ म्हणून भूमिका वठवायची असते. आपणही पूर्वप्राथमिक शिक्षणाला महत्त्व दिल्यास प्राथमिक शिक्षणाची पायाभरणी चांगली झालेली दिसून येईल. मूल विकासाचे टप्पे झपाट्याने पार करताना आढळेल.
परंतू मुलांची सर्वाधिक ग्रहण क्षमता असलेल्या या काळाचा आपण उपयोग करून घेत नाही. या वयात त्यांना सुयोग्य पद्धतीने इंद्रिय शिक्षण, संस्कार शिक्षण देणे गरजेचे आहे. बालकांचा हा महत्त्वपूर्ण काळ आपण वाया घालवतो.
शून्य ते सहा वयोगटात बालक त्याच्या जीवनातील ५० टक्के ज्ञान प्राप्त करीत असतो. उर्वरित वयात तो ५० टक्के ज्ञान ग्रहण करतो. तेव्हाच या पिढीद्वारे उद्याच्या समाजाचं व देशाचं उज्वल भवितव्य निर्माण होऊ शकतं. त्याला योग्य वळण लावण्याचे काम महिला अधिक सक्षमतेने व कौशल्यपूर्वक करू शकतात.
मुलांमध्ये कमी वयातच त्यांच्यातील क्षमता, त्यांच्यातील कौशल्य, आकलन हे ओळखले गेले, तर निश्चितच उद्याचे यशस्वी नागरिक हे निरनिराळ्या क्षेत्रांत घडेल. त्याला योग्य वळण लावण्याचे काम महिला अधिक सक्षमतेने व कौशल्यपूर्वक करू शकतात.
मी पूर्वी माझ्या एका लेखात सुचवल्याप्रमाणे या बालकांच्या शिक्षण, शिक्षकांच्या आणि पालकांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाकडे तर नाश्ता, जेवण यांची जबाबदारी महिला आणि बालकल्याण, या बालकांच्या आरोग्याची जबाबदारी आरोग्य खात्याकडे, वाहतूक आणि शैक्षणिक साधने, खेळणी यांची जबाबदारी समाजकल्याण, तर आदिवासी भागांत बालकांच्या संगोपनाची संपूर्णपणे जबाबदारी अशी वाटणी करायला हवी.
बालवाडी किंवा शिशूवर्गात मुले वयाच्या दुसऱ्या वर्षी दाखल होतात. भारतात शाळेत दाखल्यासाठी किमान वयोमर्यादा पाच वर्षे आहे. त्याआधी दोन ते तीन वर्षे मुले/मुली बालवाडी/शिशूवर्गात (प्ले ग्रुपमध्ये) घालवतात.
बालवाडीमध्ये मुलं बोलणे, वागणे, वावरणे व विविध समन्वय शिकतात. विविध शैक्षणिक खेळ जसे रंग ओळखणे, आकार ओळखणे, चित्र काढणे/रंगवणे इत्यादी क्रिया बालवाडीमध्ये शिकवल्या जातात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.