व्यवसाय वृद्धीसाठी वापरा सोशल मीडिया!

K C Pande
K C Pande esakal
Updated on

लेखक : के.सी.पांडे

सोशल मीडियामुळे आज जग इतके जवळ आले आहे, की अगदी शेजारच्याकडेही पाहायला आपल्याला वेळ नाही. सर्वाधिक वेळ त्यासाठी दिला जात आहे. ज्ञानवृद्धीसाठी त्याचा उपयोग होत असेल तर ठीक, पण अवाजवी वेळ देणे घातक आहे. पण याच सोशल मीडियामुळे तुमच्या व्यवसायाची वृद्धी होऊ शकते, हे फार कमी जण समजून घेतात. या माध्यमांचा वापर अनेकांनी त्यासाठी करून घेतला आहे. मलाही गारगोटीच्या व्यवसायासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला आहे, हे येथे नमूद करावेसे वाटते. (Saptarang Latest Marathi Article on Use Social Media for Business Growth by KC Pande Nashik News)

K C Pande
मीठ आणि पक्षी
esakal

सोशल मीडिया आजमितीस आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. जवळपास प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाचा वापर आपल्या गरजेनुसार करत आहे. सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे, की ज्याने लोक एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडली जातात. विविध प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर करून लोक एक दुसऱ्याशी संवाद साधू शकतात. आपल्यातील कला, कौशल्य व भावना जगासमोर काही क्षणात घरबसल्या व्यक्त करू शकतात. गारगोटीसारखा लवकर न समजणारा इतर विषयांपेक्षा वेगळा छंद जोपासत असताना सुरवातीस काही अडचणी आल्या; पण २००४ नंतर सोशल मीडियाची क्रांती झाल्यामुळे व जग एका टच स्क्रीनवर आल्यामुळे गारगोटीसारखी नैसर्गिक संपत्तीचे सौंदर्य मी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवू शकलो. सोशल मीडियामुळे जग जवळ आल्यासारखं वाटलं.

मी जेव्हा गारगोटीला समर्पित झालो व जेव्हा मी ठरवलं माझं उर्वरित आयुष्य हे सगळं गारगोटीमध्ये करिअर करण्यासाठी असेल, त्या वेळी माझ्या मनात यत्किंचितही विचार आला नाही, की भविष्यात जग सोशल मीडियाच्या माध्यमातून इतके जवळ येईल. आपले प्रयत्न जर प्रामाणिक असेल तर नशिबाची साथही मिळते. सोशल मीडियामुळे बदलत्या जगानुसार भविष्याचा वेध घेण्याची फक्त निर्णयक्षमता आपल्यात हवी पाहिजे, असावी लागते.

पूर्वीच्या काळी संदेश पाठविण्यासाठी किंवा अगदी आवश्यक कामांसाठीही प्राण्यांचा किंवा पक्षांचा वापर केला जाई. या दंतकथा वगैरे आहेत, तसेच आजच्या पिढीतील मुलांना वाटेल, कारण तसेच आहे. आज आपण सातासमुद्रापलीकडील व्यक्तीशी सेकंदाचाही विलंब न करता संपर्क साधू शकतो. एवढेच काय, तर तो ज्या अवस्थेत आहे तसा त्याला पाहू शकतो. आधुनिक जगातील संपर्क साधण्याचे प्रभावी माध्यम सोशल मीडिया होय. सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कसा झाला, हे आपल्याला समजलेसुद्धा नाही. आज प्रत्येक व्यक्ती दिवसभरामध्ये सरासरी दोन ते अडीच तास सोशल मीडियाचा वापर करतात.

एक काळ असाही होता, की आपल्याला सोशल मीडिया म्हणजे काय, हेच माहीत नव्हते. आपण आपले पूर्वज एकेकाळी संदेश पाठविण्यासाठी कबूतर वापरायचे. जलद दळणवळणासाठी उंट, घोडे यांचासुद्धा वापर होत असे. एक तो काळ होता; पण आजचा काळ जिथे आपण कित्येक गोष्टींसाठी पूर्णपणे सोशल मीडियावर अवलंब आहोत, ही क्रांती फार कमी वेळात घडली आहे. प्रामुख्याने २००४ नंतर सोशल मीडियाचा वापर भारतामध्ये होण्यास सुरवात झाली. त्या वेळी माझ्यासाठीही व्यवसायाला जगभर पोचविण्यासाठी एक प्रकारची नवसंजीवनीच होती. जे लोक या क्षेत्राशी जोडलेले होते त्यांना तर गारगोटी माहीतच होती.

esakal
K C Pande
तेजोनिधी : एस. एम. जोशी

पण ज्या लोकांना भूगर्भातील दगडांची अद्‍भुत दुनिया ही मला प्रत्येक व्यक्तीला दाखवायची होती. मला सोशल मीडियातून दाखविण्याची एक संधी प्राप्त झाली. इंटरनेटच्या माध्यमातून ई-मेल ऑर्कुट, फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर अशी अनेक माध्यमे आहेत. आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेली आहे. मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक सुरू केले तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल, की फेसबुक इंटरनेट जगाची उलथापालथ करेल. सुरवातीला फक्त हॉवर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधता यावा, एवढाच हेतू फेसबुकच्या निर्मिती मागे होता. माझ्या व्यवसायातही तसेच झाले; जेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा कोणालाही वाटलं असेल, की मी या व्यवसायातला जगातील मोठा उद्योगपती होईल.

फेसबुक जगभरात पसरले. सध्या सोशल मीडियामुळे प्रचंड सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मित्रांशी, नातेवाईकांशी एवढेच काय, तर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधता येतो. आपला व्यवसाय वाढविता येतो. आपल्या दैनंदिन जीवनातील खासगी गोष्टीही इतरांना शेअर करता येतात. न्यूजस्पीड हे फेसबुकचे फिचर क्रांती घडवणारे ठरले. याचा वापर करून अनेक देशातील सरकारे निवडून आली किंवा पडली वा पाडली गेली. शासनाविरोधात जनमत तयार करण्याचे काम लोकांना एकत्र आणणे किंवा फूट पाडण्याचे कामही सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज होऊ शकले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या सोशल मीडियामुळे आपल्या वापरकर्त्याच्या गरजा ओळखून वेळोवेळी स्वतःमध्ये सुधार घडून आणणे, हे या सोशल मीडियाच्या यशाचे गमक होय.

सोशल मीडियाचे अमर्याद लाभ आहेत. सोशल मीडियाची ताकद वापरून शासनाला लोक जागृत करू लागले. सोशल मीडिया आपल्या जगण्याची पद्धत बदलत आहे. येथे प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे. सोशल मीडियासाठी नक्कीच एक वरदान आहे आणि यामध्ये जगाला बदलण्याची शक्ती आहे. सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक भाग बनत आहे. त्याचे खूप फायदे आहेत; पण त्याचे काही नुकसानदेखील आहे. सोशल मीडियाचा वापर आपल्या गरजेनुसार वापर संशोधन, आपला व्यवसाय वाढीसाठी व पब्लिक कनेक्टसाठी होणे गरजेचे आहे. काही लोकांचे असे म्हणणं आहे, की सोशल मीडियाचा अतिवापर इतका झाला आहे, की लोक संवाद साधण्यासाठी एकमेकांना भेटत नाही. सोशल मीडियावर बनवल्या जाणाऱ्या मित्रांकडून फसवणूकही केली जाऊ शकते.

काही लोक सोशल मीडियाद्वारे आपला वैयक्तिक डेटा बेकायदेशीरपणे चोरतात, हे एका गुन्ह्याच्या प्रकारात येते. सोशल मीडियाचे काही हॅकर्स आपले सोशल मीडिया अकाउंट हॅक करू शकतात. ज्याद्वारे त्यांना आपली गोपनीय माहिती मिळते. त्यामुळे सोशल मीडियावरील लोकांनी या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. विद्यार्थिदशेतील मुले-मुली ही दररोज सोशल मीडियावर जास्त वेळ घालवितात. त्याचा अभ्यासावर वाईट परिणाम होतो. शालेय मुलांना सोशल मीडियावरही अधिक रस निर्माण झाला आहे. यामुळे मुले मैदानी खेळापासून दूर चालली आहेत. पण प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही चांगले व वाईट असते. त्यामधून आपण सकारात्मक बाबी घ्याव्या व चुकीच्या गोष्टी टाळाव्यात, असे माझे मत आहे.

K C Pande
इच्छामरण मागणाऱ्या गोखले पुलाची चित्तरकथा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com