दगडांच्या देशा : कृतज्ञता शक्ती ही आयुष्य बनवते सुंदर!

Saptarang Article
Saptarang Articleesakal

लेखक : के. सी. पांडे

सृष्टीचा निर्माता ईश्वर आहे. आपण त्या सृष्टीचे एक घटक आहोत, त्याच्यामुळे हे जग आणि आपण अस्तित्वात आलो, यामागे ईश्वर आहे. आपले सुख-दुःख, बुद्धी, कर्म, कुटुंब, देश, धर्म, साधना हे सर्व नंतर आहे.

त्यामुळे जेथे जेथे ‘मी’चा विचार मनात असेल, तेव्हा ईश्वराविषयी किंवा त्याच्या कोणत्यातरी स्वरूपाविषयी जाणीव असणे आणि त्या जाणिवेचे श्रेय ईश्वराला अर्पण करणे याला ‘कृतज्ञता’ म्हटले गेले आहे. प्रार्थनेचा दुसरा अर्थ शरणागती आणि शरणागतीची प्रक्रिया कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय पूर्ण होत नाही. (saptarang marathi article on dagdanchya desha Gratitude is power that makes life beautiful by KC pandey nashik news)

Saptarang Article
राजकारणाचा नवा अध्याय

गारगोटीसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यावसायिक प्रवासात मी कायम सर्वांप्रति कृतज्ञ राहिलो आहे. जे भेटले त्यात समाधानी, आनंदी राहा, हे तत्त्व कायम जोपासले. त्यामुळेच मी यशस्वी होऊ शकलो. कृतज्ञता शक्ती ही आयुष्याचा प्रवास सुंदर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. कृतज्ञता ही ऊर्जा आहे.

चांगल्या गोष्टी आपल्या स्वतःच्या पलीकडे आहेत. शिवाय या सृष्टीमध्ये उच्चशक्तीदेखील कार्यान्वित आहे, ही भावना आनंदमय प्रवासासाठी सहाय्यभूत ठरते. तर कृतज्ञता वाढवणारी भावना जी केवळ कर्माने किंवा भेटवस्तूच नव्हे, तर परस्पर संपत्ती दाखवण्याचा विचार करते. कृतज्ञता ही जीवनात आनंदी व समाधानी भावना निर्माण करते.

कृतज्ञता आशावाद, आनंद, उत्साह, सकारात्मक भावनांसाठी कारणीभूत ठरते. चिंता किंवा नैराश्याची भावना कृतज्ञतेच्या माध्यमातून कमी होऊ शकते. कृतज्ञता अंगी बाणल्यास शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली मजबूत झाली आहे.

याचा स्वतःमध्ये भाव निर्माण होतो. परस्परांशी संबंध मजबूत करण्यासाठीही कृतज्ञता एक प्रभावी साधन आहे. जे लोक कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांच्या संदर्भात एक नियम निश्चितपणे लागू होतो, तो म्हणजे ते इतरांना क्षमा करण्यात उत्सुक असतात.

Saptarang Article
लढा

परिपूर्णता अनुभवू पाहणारे विश्व मी डोळ्यांनी पाहू शकतो, यासाठी निसर्गाप्रति कृतज्ञतादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला लाभलेले आरोग्य, स्वप्नातील करिअर, आपल्याला हवे असलेले सर्व काही जे प्राप्त झाले, त्याबद्दल मनस्वी कृतज्ञ असले पाहिजे.

कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे देवांचे व विश्वाचे आभारही मानायला हवेत. विश्वाची सर्वोच्च देवता ज्यांच्यामुळे प्रत्येक पहाट आपण पाहू शकतो, समाजाची, देशाची सेवा करू शकतो, त्यांच्याप्रति कृतज्ञता आपल्याला आणखी प्रेरणा देऊन जाते.

प्रत्येक सायंकाळी आपल्या शरीराला आराम आणि आपल्या आत्म्याला तृप्तता देण्याची भावना ज्या शक्तीमुळे निर्माण होते, त्याप्रति कृतज्ञता न ठेवल्यास आयुष्यातील खऱ्या आनंदापासून आपण दुरावलेले राहू. ज्या गोष्टीविषयी मनात भक्तिपूर्ण कृतज्ञतेचा भाव असतो, ती आपल्याला निश्चितच प्राप्त होते.

संत मीरेच्या मनात श्रीकृष्णाप्रति भक्तियुक्त कृतज्ञता होती, म्हणूनच तिच्या मनातील प्रेमभाव अखेर फळास आला. तुम्ही या भावनेत दंग होऊन संतुष्टी निश्चितपणे प्राप्त करू शकता. यशस्वी जीवनासाठी निसर्गातील दृश्य-अदृश्य शक्ती सक्रिय व्हाव्यात, असं तुम्हाला वाटतं असेल, तर कृतज्ञता जोपासायला हवा.

समृद्धी, उत्साह, भक्ती, मधुर नाती, सकारात्मक कार्य आणि पूर्णत्व अशा पैलूंनी आयुष्याची सफर अविस्मरणीय व्हावी, असं वाटत असेल, तर कृतज्ञतेची शक्ती जाणा, ती निर्माण करा आणि जोपासा.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Saptarang Article
व्याघ्र संरक्षणाची मुहूर्तमेढ

तो असे वागला, तो तसे वागला, कोण कसे वागतोय, या विचारांमुळे स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसे वागायचे, याचा विचार करणे गरजेचे ठरते. आपण कुठे चुकतो? याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरवात करा. या दुनियेत असा एकही मनुष्य नाही, की ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी नाहीत.

ज्याने सृष्टी निर्माण केली, त्यालाही ते भोगावे लागले. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी मनासारख्या झाल्याच पाहिजेत, हा आग्रह माणसाच्या सर्व दु:खाला कारणीभूत ठरतो. कोणाच्या वाईट वागण्याने आपले वाईट होत नसते. मिळतं तेच जे आपण पेरलेल असते.

आपल्याशी कोण कसे वागेल? पण आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचे. इतके चांगले, की विश्वासघात करणाराही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे. आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते, जेव्हा जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली, तरी घाबरून जाऊ नका.

फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे आपण जिवंत आहोत, म्हणजेच खूप शिल्लक आहे. जी माणसे स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात, ती माणसं आयुष्यात कधीही मागे राहत नाहीत. हेच मी आयुष्यभर जपलं आणि त्यामुळेच जगाच्या पटलावर गारगोटी उद्योगसमूहाची एक वेगळी ओळख निर्माण करू शकलो.

जगणं कोणाचेही सोपे नसते. आपण सोडून बाकी सगळ्यांचे चांगले आहे, असे फक्त आपल्याला वाटत असते. सर्वांत सुखी माणूस तोच आहे, जो आपली किंमत स्वतः ठरवतो. सर्वांत दुःखी माणूस तो, जो आपली तुलना इतरांशी करतो. आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीही कुणाला सापडू देऊ नका.

Saptarang Article
कोलकात्यातील दुसरी दुर्गापूजा!

सफल, समृद्ध जीवनासाठी आजपासून प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्यायला सुरवात करा. सकाळी डोळे उघडताच प्रकाशासाठी सूर्याला धन्यवाद द्या... नवा दिवस दाखवल्याबद्दल ईश्वराचे आभार माना... भोजन करण्यापूर्वी शेतकऱ्याला, निसर्गाला आणि ज्यानं अन्न बनवलं, त्यालाही धन्यवाद द्या... ज्या धरणीमातेचा आधार घेत तुम्ही चालता, तिलाही धन्यवाद द्या...

आइनस्टाईन यांचे अनुकरण

अल्बर्ट आइनस्टाईन या प्रतिभावान, रचनात्मक संशोधकाला आज संपूर्ण जग सलाम करतं. पण त्यांना जेव्हा त्यांच्या यशाचं मर्म विचारण्यात आलं, तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘मी प्रत्येक गोष्टीसाठी हृदयापासून धन्यवाद देतो!’

आइनस्टाईन यांना जेव्हा कोणी सहकार्य करायचे, तेव्हा त्यांच्या मनात त्या मनुष्याप्रति दिवसभरात कमीत कमी शंभरहून अधिकवेळा धन्यवादाचे भाव निर्माण व्हायचे. याचे अनुकरण आपण करण्यास काय हरकत आहे?

कृतज्ञता म्हणजे आपल्याला जे काही प्राप्त झाले आहे, त्याबाबत कृतज्ञतेची भावना असणे. एखाद्या गोष्टीबद्दल धन्य झाल्याची भावना अनुभवणे. कृतकृत्य झाल्याची भावना अंतकरणापासून व्यक्त करणे. कृतज्ञता म्हणजे केवळ शब्द नसून तो प्रेमभाव आहे. हा असा भाव आहे, जो जीवनरूपी प्रवासाला योग्य दिशा देतो.

मग तुमची वाटचाल सुरू होते अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, अंधश्रद्धेकडून आत्मश्रद्धेकडे, आंतरिक संघर्षाकडून परमशांतीकडे, अस्वास्थाकडून स्वास्थाकडे आणि अपयशाच्या दरीतून यशाच्या शिखराकडे. तेव्हा दोन्ही हात जोडून मला आजपर्यंतच्या जीवनात जे काही लाभले आहे, त्यासाठी मी कृतज्ञ आहे, कृतार्थ आहे... धन्यवाद, धन्यवाद!
(लेखक सिन्नरस्थित गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)

Saptarang Article
‘हिंडेनबर्ग’च्या झळा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com