'पौष्टिक आहार महत्त्वाचा' (राम यशवर्धन)

ram yashvardhan
ram yashvardhan

चांगल्या शरीरसंपदेचं एकमेव रहस्य आहे आणि ते म्हणजे उत्तम, सकस आहार. तुमच्या आहारात ताजे आणि पौष्टिक पदार्थ असतील, याची काळजी सर्वांनीच घ्यावी. त्यामुळे रोगराई तुमच्यापासून दूर राहील. मी माझ्या आहारातही ताज्या पदार्थांचा समावेश करतो. त्याचबरोबर जास्तीत जास्त फळंही खातो. त्या त्या सीझनमधली फळं खायला मला आवडतं. चांगल्या भाज्या खायलाही प्राधान्य देतो. त्यामुळं माझ्या शरीरासाठी जे-जे आवश्‍यक घटक असतात, ते मला पौष्टिक आहारामधून मिळत असतात.

"वेलनेस'चा अर्थ एक उत्तम आणि आरोग्यदायक जीवनशैली स्वीकारणं. आपण स्वत: जितके आतमधून तंदुरुस्त आहोत, असं वाटेल, तितकी ती तुमच्या आरोग्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्यासाठी सर्वांनीच आपलं आरोग्य सुदृढ राखण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर आपली दैनंदिन जीवनशैली चांगल्या पद्धतीनं कशी राखता येईल, याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्या माध्यमातूनच तुमचा वेलनेस चांगला राखला जाईल.

शरीरसंपदेचं रहस्य
चांगल्या शरीरसंपदेचं एकमेव रहस्य आहे आणि ते म्हणजे उत्तम, सकस आहार. तुमच्या आहारात ताजे आणि पौष्टिक पदार्थ असतील, याची काळजी सर्वांनीच घ्यावी. त्यामुळे रोगराई तुमच्यापासून दूर राहील. मी माझ्या आहारातही ताज्या पदार्थांचा समावेश करतो. त्याचबरोबर जास्तीत जास्त फळंही खातो. त्या त्या सीझनमधली फळं खायला मला आवडतं. चांगल्या भाज्या खायलाही प्राधान्य देतो. त्यामुळं माझ्या शरीरासाठी जे-जे आवश्‍यक घटक असतात, ते मला पौष्टिक आहारामधून मिळत असतात. आहाराबरोबर व्यायामाबाबत मी काटेकोर असतो. दिवसातून एकदा तरी व्यायाम करतो. ज्यावेळी व्यायाम करणं शक्‍य होत नाही, त्यावेळी मी दूरवर चक्करही मारतो. सर्वांनीच हा दिनक्रम पाळला, तर नक्कीच आपलं शरीर आरोग्यसंपन्न राहील.

खरंतर जिम ही अशी जागा आहे, की जिथं तुम्ही व्यायामाच्या माध्यमातून आपल्या सर्व ताणतणावांचा शेवट करू शकता. जिम हा माझा अगदी खासगी वेळ असतो. मी तो पुरेपूर वापरतो आणि खूप मनापासून व्यायाम करतो. मी जेव्हा घरातच जिमचा वापर करतो, तेव्हा मी सांगेपर्यंत माझ्या खोलीत कोणीही येत नाही. बाहेरच्या जिममध्ये व्यायाम करत असीन, तर त्या वेळेत मला दुसरे कोणी डिस्टर्ब करत नाहीत. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल, पण मी जिमबाबत कोणाकडूनही मार्गदर्शन घेत नाही. मी स्वत:च सर्व गोष्टी आपणहून शिकतो. मी माझ्या शरीरावर नेहमीच वेगवेगळे प्रयोगही करतो आणि माझं शरीर समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आपणच आपल्या शरीराला सर्वांत चांगल्या प्रकारे ओळखू शकतो, यावर मी ठाम आहे. शक्‍यतो एक दिवससुद्धा व्यायाम चुकवायचा नाही यासाठी मी खूप प्रयत्न करतो. माझ्या सर्व गोष्टी घड्याळाच्या काट्यावर चालतात. मी त्यात जराही बदल करीत नाही. मी दिवसातून दोनदा जिममध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. कधी-कधी चित्रीकरणात व्यग्र असलो, तर एकदाच जाता येतं. त्यामुळे सकाळी सहा वाजता मी जिमला जाणं कधीच चुकवत नाही.

सतत लिंबूपाणी
मी दिवसातून दोन वेळेस जेवण करतो. त्याचप्रमाणं दिवसभर लिंबूपाणी पीत असतो. त्यामुळं माझ्या शरीरात पुरेसं पाणी राहतं. सकस, पौष्टिक पदार्थच खाण्याचा मी प्रयत्न करतो. प्रथिनं मिळविण्यासाठी मी दूध, पनीर, अन्य दुग्धजन्य पदार्थ, अंडी, डाळ, ब्रोकोली यांसारखे पदार्थ दररोज सेवन करतो. तसंच संध्याकाळी जेवण झाल्यावर काही वेळ तरी चालतो. याचबरोबर आपल्या शरीराला ज्या-ज्या गोष्टी आवश्‍यक आहेत, त्या आहारातून सेवन करण्याचा प्रयत्न मी करत असतो.

चौदा किलो वजन कमी
सध्या मी "स्टार भारत' वाहिनीवरच्या "एक थी राणी, एक था रावण' या मालिकेत अभिनय करत आहे. यात मी रिवाजची भूमिका साकारत आहे. यापूर्वी मी "उदय' या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. त्यानंतर "दंगल' या मालिकेमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. मात्र, रिवाजच्या भूमिकेसाठी मला खूप कसरत करावी लागली. कारण, ही सर्वगुणसंपन्न भूमिका आहे. या मालिकेच्या शीर्षकातल्या "रावण' या नावामुळं मला माझ्या भूमिकेसाठी काय तयारी करावी लागणार आहे, याची कल्पना सुरवातीलाच आली. अन्‌ ते माझ्यासाठी आव्हान होतं. त्यासाठी मी रावणाबद्दल माहिती घेतली. या भूमिकेसाठी सुरवातीला बारा किलो वजन घटवलं होतं. त्यानंतर मालिकेचं कथानक वेगळ्या वळणावर आलं, तेव्हा मी चौदा किलो वजन कमी केलं. खरं तर कमीत कमी कालावधीत वजन कमी करणं, हे आव्हानच असतं; पण ते मी यशस्वीरीत्या पेललं. त्यासाठी मी आहारावर लक्ष केंद्रित केलं आणि व्यायामाचं प्रमाण वाढवलं. आहार आणि व्यायाम यांच्या संतुलनामुळं मी हे वजन कमी करू शकलो.

मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं
शारीरिक स्वास्थ्य माणसाला सुदृढ अन आरोग्यसंपन्न बनवतं, तर मानसिक स्वास्थ्य स्थैर्य देते. म्हणजे शारीरिक अन्‌ मानसिक स्वास्थ्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यासाठी दोन्ही बाजू भक्कम असणं गरजेचं आहे. त्यामुळं मन प्रसन्न ठेवणं खूप महत्त्वाचं. मन प्रसन्न करण्यासाठी मी कधी गाणी गातो आणि जर मला एकांत मिळाला, तर कविताही करतो. या दोन्हीही गोष्ट माझं मन प्रसन्न करतात. मी योगासनं आणि प्राणायाम करत नाही. मी सर्व व्यायाम जिममध्येच करतो. त्यातूनच मी आरोग्यसंपन्न झालो आहे. त्यामुळं मला योग आणि प्राणायाम करण्याची गरजच भासत नाही.

कुटुंबाचा आरोग्यावर परिणाम
खरं तर आपल्या कुटुंबातल्या वातावरणाचा आपल्यावर नकळत परिणाम होत असतो. कुटुंबातलं वातावरण जेवढं प्रसन्न, आनंदी अन्‌ हेल्दी असतं, तेवढंच आपणही प्रसन्न असतो. विशेष म्हणजे माझ्या कुटुंबातले सर्व जण माझ्यावरून व्यायामाची प्रेरणा घेतात. तसंच, डाएटबद्दलही टिप्सही घेतात. घरासह सेटवरचे सर्व जण माझ्याकडून खाण्या-पिण्याबाबत; तसंच जिममध्ये व्यायामाबाबत मार्गदर्शन घेतात. त्यातून त्यांनाही प्रेरणा मिळते. खरं तर फिटनेस आणि वेलनेसबाबत हॉलिवूडचा अभिनेता सिल्व्हेस्टर स्टॅलोन हा माझं प्रेरणास्थान आहे. मी नेहमीच त्याच्याकडून प्रेरणा घेतो. त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टी वाचून काढतो.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com