उपयोजित संगीत (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

संगीत ऐकल्यानं मन तर प्रसन्न होतंच; पण त्यानं मानसिक स्वास्थ्यही लाभतं. ‘सं’ म्हणजे स्वर, ‘गी’ म्हणजे गीत आणि ‘त’ म्हणजे ताल होय. संगीत ही ईश्वरानं दिलेली देणगीच आहे असं म्हणता येईल. ती आयुष्याला प्रेरणा देते. या संगीताचा आपल्या दैनंदिन जीवनात कळत-नकळत वापर-उपयोग केला जात असतो.

संगीत हे नेहमीच आनंद देणारं, मन:शांती देणारं असतं. कोणतंही काम करत असताना एकीकडे संगीत सुरू असलं की काम चुटकीसरशी संपतं. कामाचा तेवढा शीण जाणवत नाही. संगीतातून आनंद मिळवणं एवढा एकच उद्देश पूर्वीच्या काळी असायचा. राजे-महाराजे विरंगुळ्यासाठी संगीत ऐकत. ‘मला संगीताची आवड नाही,’ असं म्हणणारे लोकसुद्धा संगीत कळत-नकळत मोठ्या प्रमाणात ऐकतच असतात; पण हे त्यांच्या लक्षातही येत नाही. संगीत आपलं आयुष्य अधिक सुकर, सुलभ आणि आनंददायी करत असतं.
संगीत ऐकल्यानं मन तर प्रसन्न होतंच; पण त्यानं मानसिक स्वास्थ्यही लाभतं.
‘सं’ म्हणजे स्वर, ‘गी’ म्हणजे गीत आणि ‘त’ म्हणजे ताल होय. संगीत ही ईश्वरानं दिलेली देणगीच आहे असं म्हणता येईल. ती आयुष्याला प्रेरणा देते. या संगीताचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग केला जातो ते आपण आता पाहू या.

दूरचित्रवाणीवरच्या जाहिरातींमध्ये, मालिकांमध्ये संगीताचा वापर केला जातो. संगीताखेरीज जाहिराती, मालिका रुक्ष व कंटाळवाण्या वाटतील. याचं कारण असं की संगीतामुळे दृश्यमालिका प्रभावी होतात. उदाहरणार्थ : एखादा अत्यंत भीतिदायक सिनेमा मूक चित्रपटासारखा बघितल्यास लक्षात येईल की पार्श्वसंगीताशिवाय अपेक्षित परिणाम साधला जात नाही. आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव संगीताचा असतो.
प्रार्थनेत मन एकाग्र करण्यासाठी, आरतीत, मंत्र-स्तोत्रांमध्ये संगीताचा वापर केला जातो.
सणांच्या वेळी संगीत वापरलं जातं. उदाहरणार्थ : हादग्याची किंवा दांडियाची गाणी. गणेशोत्सवात तर सर्वत्र गाणी वाजवली जातातच.
मन बांधणारं रसायन म्हणून संगीताचा वापर केला जातो. उदाहरणार्थ : काही काही ऑफिसांत मंद आवाजात संगीत लावलेलं असतं. समारंभांमध्ये वातावरण आनंदी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी संगीत लावलं जातं. उदाहरणार्थ : लग्नकार्यातला सनई-चौघडा. सनई-चौघड्याशिवाय हा सोहळा अपूर्ण वाटतो.
लहानपणी पाठांतरासाठी संगीताचा वापर केला जातो. कारण, संगीत हे स्मृतीला साह्यभूत ठरतं. उदाहरणार्थ : आपण म्हणत असलेले पाढे किंवा कविता एखाद्या चालीत बांधलेल्या असतात; जेणेकरून त्या लवकर पाठ व्हाव्यात.
समाजाला एखादी शिकवण द्यायची असल्यास ती संगीताद्वारे दिली जाते. उदाहरणार्थ, पूर्वीची ही एक जिंगल : ‘पढना-लिखना सीखो, ओ मेहनत करनेवालों.’
एखादा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचा असल्यास संगीताद्वारे लवकर पोहोचतो. उदाहरणार्थ, या काव्यपंक्ती : ‘पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा, जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा.’
राजकीय प्रचारही संगीतातून केलेला आढळतो.
व्यायाम करताना थकवा घालवण्यासाठी संगीताचा वापर केला जातो. उदाहरणार्थ : जिममधे संपूर्ण वेळ संगीत सुरू असतं; जेणेकरून तालबद्ध संगीताच्या साह्यानं सगळे व्यायामप्रकार केले जाऊ शकतात. आणखी एक उदाहरण म्हणजे, वॉकिंगला जाणारे लोक फोनवर हमखास गाणी ऐकत असतात. मसाज करताना मन शांत करण्यासाठी मंद संगीत लावलं जातं.
मानसिक व शारीरिक व्याधी बऱ्या करण्यासाठी संगीताचा उपयोग केला जातो. विशेष मुलांना संगीताच्या माध्यमातून शिकवलेलं अधिक उपयोगी ठरतं.
गाड्यांचे हॉर्न, फोनची रिंगटोन, डायलर टोन, दारावरची बेल यांतही संगीतच असतं. लिफ्टमध्येही संगीत वापरलं जातं.
वेदनांचा विसर पडण्यासाठी संगीत अत्यंत उपयोगी पडतं. उदाहरणार्थ : रुग्णांसाठी संगीताचे कार्यक्रम अनेक वेळा आयोजिले जातात.
चुळबुळ करणारी बाळं अंगाईगीताच्या सुरांनी चटकन झोपून जातात. लहान मुलांना एका जागी स्थिर बसवण्यासाठी व एकाग्रतेसाठी संगीत शिकवलं जातं. लहान मुलांना एकाच वेळी हात-मन-बुद्धी उत्तमरीत्या वापरता येण्यासाठी एखादं वाद्य शिकवलं जातं. झाडांसाठी व जनावरांसाठीदेखील संगीताचा उपयोग होतो असं संशोधनातून सिद्ध झालं आहे.

या सर्व गोष्टींतून कालौघात संगीताचं व्यवसायीकरण झालं. पूर्वी कलाकार मिळेल त्या बिदागीवर खूश असत; पण हळूहळू चित्र बदललं. कार्यक्रमातून किंवा रेकॉर्डिंगच्या माध्यमातून संगीत विकलं गेलं. कार्यक्रमांची संख्या वाढली. लग्नकार्यातून, सणांमध्ये कार्यक्रम ठरू लागले. इव्हेंट मॅनेजमेंटमधून संगीत पुढं आलं. टीव्हीवर सांगीतिक स्पर्धा सुरू झाल्या. या स्पर्धांनी अनेक लोक संगीताकडे आकृष्ट झाले. स्पर्धेच्या माध्यमातून अनेक लोकांना संगीताबद्दल अधिक ज्ञान मिळालं. संगीताला व कलाकारांना प्रतिष्ठा मिळाली. नवनवीन कलाकार उदयाला आले.
चित्रपटसंगीतातून हजारो कलाकारांना संधी मिळायला लागली. संगीत हे उपजीविकेचं साधन झालं. संगीतकार, म्युझिक ॲरेंजमेंट करणारे ॲरेंजर, गायक, संगीतशिक्षक, ध्वनिमुद्रण करणारे, बॅकग्राउंड म्युझिक करणारे, आकर्षक डिझाइन करणारे ग्राफिक डिझायनर आदी. या सर्व लोकांच्या कौशल्यामुळे संगीत अधिक समृद्ध होत गेलं आणि त्याची व्याप्ती वाढली.

आज संगीताची व्याप्ती जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. प्रत्येक जण प्रत्यक्ष गात-वाजवत नसला तरी प्रत्येकाचं संगीताशी अतूट नातं असतं. नैसर्गिक संगीताव्यतिरिक्त इतर किती तरी प्रकारे संगीताचं उपयोजन आपण करत असतो.
संगीताचा उपयोग उपाचारांसाठीही केला जातो. त्याबद्दल आपण पुढच्या लेखात जाणून घेऊ या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com