कॅथलिक चर्चभोवतीची गूढता आणि रहस्यं कायमच रोचक निरंजक कथांना प्रेरणा देणारी ठरली आहेत. रॉन हॉवर्डने डॅन ब्राऊनच्या कादंबऱ्यांवर बनवलेले ‘द दा विन्ची कोड’ (२००६) आणि ‘एंजल्स अँड डीमन्स’ (२००९) हे थरारपट सहज आठवतात.
एका ज्युईश मुलाचे अपहरण करून त्याला कॅथलिक म्हणून वाढवलं याविषयीचा मार्को बेलोचिओ या दिग्दर्शकाचा ‘किडनॅप्ड’ (२०२३) हा थरारपटही अलीकडेच येऊन गेला. शिवाय, नानी मोरेती या इटालियन दिग्दर्शकाच्या ‘वुई हॅव अ पोप’सारखे (२०११) मजेशीर चित्रपटही आहेत. एडवर्ड बर्गर या दिग्दर्शकाचा ‘कॉन्क्लेव्ह’ हा या यादीतील एक महत्त्वाचा चित्रपट आहे.