Marathi Book : सेक्युलॅरिझम, धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा; शेषराव मोरे यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित

Secularism religious freedom uniform civil code book : ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांचा ‘सेक्युलॅरिझम, धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. राज्यघटना, धर्मस्वातंत्र्य व समान नागरी कायद्याचा घटनात्मक अर्थ अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत तरुणांना चिकित्सक विचारासाठी प्रवृत्त करणारा हा संदर्भग्रंथ ठरत आहे.
Secularism religious freedom uniform civil code book

Secularism religious freedom uniform civil code book

esakal

Updated on

गणाधीश प्रभुदेसाई - ganadhish.prabhudesai@esakal.com

‘सेक्युलॅरिझम, धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा’ हा ज्येष्ठ विचारवंत व लेखक शेषराव मोरे यांचा बहुप्रतीक्षित ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. ‘राज्यघटनेतील ‘सेक्युलॅरिझम’ व ‘धर्मस्वातंत्र्य’ यांचा अप्रिय, पण सत्य अर्थ समजून घेऊ इच्छिणाऱ्या जिज्ञासू व अभ्यासू तरुणांना, विद्यार्थ्यांना हा ग्रंथ अर्पण...’ या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेतील ओळी लेखक शेषराव मोरे यांची पुस्तक लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट करतात. या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन होण्याची असलेली गरज अधिक अधोरेखित करतात.

मोरे यांचा आजपर्यंतचा साहित्यप्रवास लक्षात घेता याही पुस्तकाच्या निर्मितीमागील त्यांचे कष्ट व ध्यास वाचकाला पुन्हा एकदा थक्क करतो. नुसत्या संदर्भ ग्रंथसूचीवर नजर टाकली, तरी किती खोलवर अभ्यास करून पुस्तकाची मांडणी केली आहे ते कळते. व्हॉट्सॲप विद्यापीठातून व्यक्त होणाऱ्यांनी व आपली मते बनवणाऱ्यांनी हे पुस्तक वाचणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सेक्युलॅरिझम, धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा हे तीन विषय वाटतात तेवढे वरवरचे नसून त्यांचा गाभा समजून घेतल्याशिवाय कोणीही आपली मते तयार करू नये, हे पुस्तक वाचल्यावर अधिक प्रकर्षाने जाणवते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com