S G Vasudev’s Artistic Journey : एस. जी. वासुदेव यांचा कलाप्रवास; चित्रकलेपलीकडे कलावंतांची पिढी घडवणारे योगदान

S G Vasudev : एस. जी. वासुदेव यांच्या सहा दशकांच्या कलाप्रवासात चित्रकलेसोबत कलावंतांची जडणघडण आणि चोलामंडलसारख्या सांस्कृतिक केंद्राची निर्मिती दिसते; वैयक्तिक यशापेक्षा कलासमृद्ध समाजनिर्मितीला त्यांनी महत्त्व दिले.
S G Vasudev’s Artistic Journey

S G Vasudev’s Artistic Journey

esakal

Updated on: 

हर्ष भटकळ

कोणत्याही मुक्कामापर्यंत पोहोचणे हे एस. जी. वासुदेवांचे उद्दिष्ट कधीच नव्हते. आता वयाची ऐंशी वर्षे उलटली, तरी ते पेंटिंग आणि ड्रॉइंगसोबत कोलाज जमवत असतात आणि हे करताना ते पुनरावृत्ती टाळतात. कलात्मक स्वातंत्र्य हेच त्यांना हवे. त्यांच्या दीर्घकालीन कार्यकाळाकडे पाहता त्यांच्यातले सुसंगत असे सातत्य दिसून येते. त्याच वेळी त्यांच्यातील एक वेगळा आविष्कार लक्षात येतो. इतर कलावंतही मोठे होतील याची काळजी घेणारा असा हा एक कलावंत आहे.

एस. जी. वासुदेव हे फक्त चित्रकार नव्हते. त्यांनी इतर चित्रकारांना जोपासणाऱ्या संस्था निर्माण केल्या आणि ही कला रोजच्या सांस्कृतिक जीवनाशी जोडलेली राहील याची खात्री केली. भारतीय दृश्यकलेतील एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून एस. जी. वासुदेव यांना विशेष स्थान आहे. गेली साठ वर्षे त्यांच्या कलाकृती ह्या त्यातील पुन्हा पुन्हा दिसणाऱ्या वृक्ष, प्रेमिक आणि रंगकर्मी सारख्यांच्या आकृतिबंधामुळे सहज परिचयाच्या झाल्या आहेत. तरीही त्यांचा फक्त एक चित्रकार म्हणून निर्देश करणे म्हणजे त्यांच्या फार मोठ्या योगदानाकडे डोळेझाक करणे ठरेल. त्यांची चित्रकला ही लक्षणीय आहेच, परंतु त्यांनी चोलामंडल ह्या कलावंतांच्या नगराची योजना करून तरुण चित्रकारांच्या अनेक पिढ्यांना स्फूर्तिदायक असे काम केले आहे. चोलामंडल हे तमिळनाडूमधील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र झाले आहे. त्यांच्याशी बोलताना लक्षात येते, की दृश्यकला ही त्यांच्यासाठी नेहमीच वैयक्तिक यशापयशाची बाब राहिलेली नाही तर एकूण कलाप्रेमी समाज बनवण्याची, ज्यात सृजनप्रक्रिया भरभराटीला पोहोचेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com