
Shahapur tourism
esakal
डोंगरदऱ्यांचा प्रदेश असलेल्या मेळघाटातील वनसंपदेने अनेकांना चांगलेच बळ दिले. निसर्गाच्या सान्निध्यात येथे नवनवे प्रयोग होत असून त्यातून पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे. रोजगार निर्मितीतून आर्थिक स्थैर्य प्राप्त होत असल्याने शहापूर या गावाने साधलेली प्रगती मेळघाटच्या विकासगाथेत नवा अध्याय जोडणारी आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने उचलण्यात येणारी पावले अतिशय महत्त्वाची ठरली आहेत.
चिखलदरा शहरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शहापूर या लहानशा गावाने पर्यटनातून विकासाकडे वाटचाल केली आहे. गेल्या काही वर्षांतच शहापूरचा कायापालट झाला आहे. मोठ-मोठ्या हॉटेल्ससह होम स्टे आदी सोयी निर्माण झाल्या आहेत. पर्यटनाला चालना देण्यासोबतच मध, खवा, सीताफळ, रबडीचा गोडवा पर्यटकांना आकर्षित करत आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळून त्यांच्या हातात पैसा खेळू लागला आहे.