
सर्जेराव नावले- saptrang@esakal.com
ग्रामीण कथालेखक आणि कथाकार म्हणून ७० च्या दशकात महाराष्ट्राच्या घराघरांत अजरामर झालेले आणि त्या काळावर ग्रामीण साहित्याचा ठसा उमवटणारे, कथालेखनातून आणि कथाकथनातून ६० ते ८० च्या दरम्यानच्या पिढीवर गारुड निर्माण करणारे शंकर पाटील हे ग्रामीण साहित्यात दीपस्तंभ बनून गेले आहेत. ज्येष्ठ ग्रामीण कथाकार, चित्रपट कथालेखक शंकर बाबाजी पाटील यांची आठ ऑगस्टपासून जन्मशताब्दी सुरू होत आहे. त्यानिमित्त...