

India’s extraordinary para archer Sheetal Devi
Sakal
जयेंद्र लोंढे jayendra.londhe@esakal.com
मास्टरस्ट्रोक
दुर्दम्य इच्छाशक्ती अन् अपार मेहनतीच्या जोरावर आपण कुठलीही बाब साध्य करू शकतो, हे दाखवून दिले आहे जम्मू-काश्मीरच्या १८ वर्षीय शीतल देवी या कन्येने. जन्मल्यापासून दोन हात नसलेल्या शीतल देवी हिने अठराव्या वर्षांपर्यंत पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करीत भारताचा झेंडा दिमाखात फडकवला. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात तिच्या शिरपेचात आणखी एक विक्रमी अन् मानाचा तुरा रोवला गेला. आशियाई करंडक स्टेज थ्री या प्रतिष्ठेच्या तिरंदाजी स्पर्धेसाठी ती पात्र ठरली आहे. विशेष म्हणजे ती आता भारताच्या पॅरा (अपंग, दिव्यांग) संघामधून नव्हे तर सामान्य संघामधून खेळताना दिसणार आहे. हे नसे थोडके. भारताच्या सामान्य संघामधून खेळणारी ती आपल्या देशाची पहिलीच पॅरा ॲथलीट ठरली.