Marathi New Books : विज्ञानयुगातील मानवाचा अस्तित्वासाठीचा संघर्ष

Shivaji Maharaj's Strategic Warfare : छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ ते १६६३ या काळात मुघलांविरुद्ध थेट युद्ध टाळत छापामार, रसदखंडणी आणि क्षयकारी युद्धनीतीचा प्रभावी वापर करून शत्रूला मानसिक व लष्करीदृष्ट्या कमकुवत केले.
Shivaji Maharaj's Strategic Warfare

Shivaji Maharaj's Strategic Warfare

esakal

Updated on

अनघा शिराळकर - saptarang@esakal.com

भुवनेश्वरीचा कल्लोळ’ ही डॉ. रंजन गर्गेलिखित वैज्ञानिक कादंबरी आहे. कादंबरीच्या मुखपृष्ठावरूनच भुवनेश्वरीच्या म्हणजे पृथ्वीच्या कल्लोळाची कल्पना येते. कादंबरीचा ‘क्लाय-फाय विज्ञान कादंबरी’ असा उल्लेख मुखपृष्ठावर केलेला असला तरी ती केवळ ‘क्लायमेट फिक्शन’ (क्लाय-फाय) म्हणजेच हवामान व विज्ञान यावर नसून ती मानवाच्या अस्तित्वासाठी चाललेल्या संघर्षाची कथा आहे.

कादंबरीमध्ये पर्यावरणीय संकट, विज्ञानाची प्रगती, माणसांच्या पिढ्यांमधील दरी, टेस्ट ट्युब बेबी व सरोगसी तंत्रज्ञान, कीटकनाशकाच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम, मधमाशी प्रकल्प, कोरोनाचा कहर, नैसर्गिक आपत्तींपासून स्वतःचं संरक्षण करण्याचे मानवाचे केविलवाणे प्रयत्न, वेगाने विकसित होणारी अत्याधुनिक रोगचिकित्सा आणि औषधोपचार पद्धतीमुळे वाढत चाललेले मानवाचे आयुष्यमान, मानवी मस्तकाचे प्रत्यारोपण, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मंगळावरील मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा घेतलेला शोध, क्लोनिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने पृथ्वीवरील लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंगळग्रहावरील १२ ते १५ लाख वर्षांपूर्वी जन्मलेल्या सुमारे ३६ वर्षे वयाच्या पुरुषाच्या जीवाश्म झालेल्या मेंदूची कथा, त्या जीवाश्माच्या ‘डीएनए’वरून पृथ्वीवरील काही जमातीतील मानवाच्या डीएनएशी पडताळणी करणे, भविष्यातील अतिप्रगत तंत्रज्ञान, इत्यादी विषयांवरील माहिती लेखकाने अत्यंत रंजकपणे कथासूत्रात गुंफली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com