कृत्रिम बुद्धिमत्ता आणि काटेकोर शेती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक उत्पादने आता वाढविणे शक्य आहे. त्यासाठी नवीन पीक पद्धती उपयोगात आणणे आवश्यक आहे. यातून पाणी, खत, मजूर आणि वेळेची बचत होणार आहे. याचबरोबरीने जमिनीचा पोत सुधारून गुणवत्तापूर्ण पीक उत्पादन वाढीला चालना मिळेल हे सिद्ध झालेले आहे.