

ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
वाचनात एक छान गोष्ट आली होती. एक पत्रकार त्याच्या कामाच्या निमित्ताने विविध लोकांशी संवाद साधायचा. एकदा त्याचं काही कारणाने कारागृहात जाणं होतं आणि कैद्यांशीही संवाद होतो. एका कैद्याचं म्हणणं त्याच्या विशेष लक्षात राहतं. तो सांगतो, की ‘‘आमच्या घरात सतत भांडणं आणि मला लागलेली संगत यामुळे मी बिघडत गेलो आणि हा असा गुन्हेगार झालो!’’ यावरून पत्रकार निष्कर्ष काढतो, की आपण लहानपणापासून ज्या वातावरणात वाढतो तसंच आपण वर्तन करतो आणि ते अगदी स्वाभाविक असतं. आपण ऐकत आलेली ही गोष्ट आज प्रत्यक्ष समोर पाहिली असंच त्याला वाटतं; पण पुढची गंमत अशी, की योगायोगाने हाच पत्रकार एका उद्योजकाची मुलाखत घेतो आणि त्या वेळी त्याची व्यावसायिक पार्श्वभूमी विचारतो. उद्योजक म्हणतो, ‘‘कसलं काय हो.