

Art For Change
sakal
गौरी देशपांडे-gaurisdeshpande1294@gmail.com
‘‘मी नाही चोरले रंगीत खडू! खरंच मी नाही चोरले!’’ सूरी हेच पुन्हा पुन्हा पोटतिडकीने सांगत होता. त्याच्या वर्गातल्या एका मुलाच्या दप्तरातून नवीन रंगपेटी गायब झाली होती. सूरीकडचे तुटके रंगीत खडू, जुन्या चपला आणि फाटकी खाकी चड्डी पाहून सगळ्यांनी त्याच्यावरच आळ घेतला होता.