

St. Denis Medical Series
esakal
‘सेन्ट डेनिस मेडिकल’ ही मालिका प्रत्यक्ष गंभीर विषयांची खिल्ली न उडवता, त्या विषयांभोवतीच्या मानवी वागण्यावर, त्यातील विसंगतीवर हसते.
‘सेन्ट डेनिस मेडिकल’ ही मालिका पाहताना प्रथम जाणवतं ते तिच्या मॉक्युमेंटरी-सिटकॉम या स्वरूपाचं आश्चर्यकारक सहजपणे जमलेलं संतुलन. ‘दि ऑफिस’, ‘पार्क्स अँड रेक’, ‘मॉडर्न फॅमिली’ अशा काही गाजलेल्या मालिकांनंतर मॉक्युमेंटरी हा प्रकार फारच ओळखीचा झाला असला तरी, ‘सेन्ट डेनिस मेडिकल’ त्या चौकटीला एक नवीन, वेगळा आवाज आणि एक विलक्षण ठिकाण मिळवून देते. हास्यास्पद परिस्थिती, डॉक्युमेंटरी-कॅमेराच्या क्लोज-अप्स आणि अचानक पात्रांनी कॅमेराकडे टाकलेले तिरकस कटाक्ष हे सारे आपल्याला परिचित आहे, पण मालिकेचा साधला गेलेला ताल मात्र खास आहे. कारण, हॉस्पिटलच्या अस्थिर, अराजक आणि कधी कधी भयंकर विचित्र जगात सतत जाणवणारा जिवंतपणा त्यात जमून आला आहे.