
फिरोझ गांधी यांचे वास्तविक फिरोझ जहांगीर घांधे असे होते असे सांगितले जाते. फिरोझ गांधी यांचा जन्म पारशी कुटुंबामध्ये झाला होता. त्याचे पालक फारदून जेहांगीर घांधे आणि रातीमाई हे बॉम्बेमध्ये राहत होते. 1930 मध्ये आपले शिक्षण सोडून दिल्यानंतर फिरोझ घांधे यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रवेश केला. याचवेळी महात्मा गांधी यांच्या विचाराने संपूर्ण भारत प्रेरित झाला होता. महात्मा गांधी या महात्मानं सगळा भारत ढवळून काढला होता. अनेक तरुण गांधीच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेत होते. याच काळात फिरोज गांधी महात्मा गांधीच्या विचाराने प्रेरित झाले आणि त्यांनी आपले आडनाव घांधे बदलून घेऊन गांधी असे करण्याचा निर्णय घेतला
कहाणी इंदिरा आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाची
स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला होता तर, मृत्यू 31 ऑक्टोबर 1984 रोजी झाला. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या 1966 मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या.
तसे पाहिल्यास त्यांच्या लग्नाचे अनेक किस्से सांगितले जातात. परंतु त्यांच्या लग्नाचा आणि आडनावाचा एक अनोखा किस्सा आहे. त्यांनी फिरोज गांधी यांच्याशी 1942 मध्ये विवाह केला होता. फिरोज जहांगीर गांधी यांचा जन्म 12 सप्टेंबर 1912 रोजी झाला होता तर मृत्यू 8 सप्टेंबर 1960 रोजी झाला. हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार व राजकारणी आणि एक प्रखर भ्रष्टाचारविरोधक होते. फिरोज गांधी हे दिल्लीतील नॅशनल हॅराल्ड व लखनौतील नवजीवन या दैनिकांचे प्रकाशक होते. ते राज्यसभेचे सदस्य होते आणि त्यांनी सभागृहात नेहरूंच्या राजकारणाचा आणि राज्यकारभाराचा सतत विरोध केला.
त्यांच्या आडनावाचा ही खूप मोठा इतिहास सांगितला जातो. फिरोझ गांधी यांचे वास्तविक फिरोझ जहांगीर घांधे असे होते असे सांगितले जाते. फिरोझ गांधी यांचा जन्म पारशी कुटुंबामध्ये झाला होता. त्याचे पालक फारदून जेहांगीर घांधे आणि रातीमाई हे बॉम्बेमध्ये राहत होते. 1930 मध्ये आपले शिक्षण सोडून दिल्यानंतर फिरोझ घांधे यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रवेश केला. याचवेळी महात्मा गांधी यांच्या विचाराने संपूर्ण भारत प्रेरित झाला होता. महात्मा गांधी या महात्मानं सगळा भारत ढवळून काढला होता. अनेक तरुण गांधीच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेत होते. याच काळात फिरोज गांधी महात्मा गांधीच्या विचाराने प्रेरित झाले आणि त्यांनी आपले आडनाव घांधे बदलून घेऊन गांधी असे करण्याचा निर्णय घेतला व ते पुढे फिरोज गांधी या नावाने ओळखले जाऊ लागले, असा उल्लेख फ्रँक कॅथरिन यांच्या 'द लाईफ ऑफ इंदिरा नेहरू गांधी या पुस्तकात सापडतो.
लग्नाच्यावेळीही इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. फिरोज गांधी यांनी सुरवातीला 1933 मध्ये इंदिरांना त्यांच्या आई कमला नेहरू यांच्याकडे लग्नासाठी मागणी घातली होती. परंतु, त्यावेळी त्या फक्त 16 वर्षाच्या होत्या. त्या लहान असल्याचे कारण पुढे करून त्यांनी लग्नाला नकार कळवला. पुढे फिरोज गांधी यांच्या कामावर इंदिरा प्रभावित झाल्या. आणि त्यांनी त्यांच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला व मार्च 1942 मध्ये त्यांनी विवाह केला. यावेळीही इंदिरांनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरु यांनी त्यास विरोध केला होता. परंतु, इंदिरा गांधी ठाम होत्या व त्यांनी मार्च 1942 मध्ये विवाह केला, असा उल्लेख प्रनय गुप्ते यांच्या 'मदर इंडिया: द पॉलिटिकल बायोग्राफी ऑफ इंदिेरा गांधी या पुस्तकात सापडतो.
फिरोज गांधींसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. 1942 च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधीं हे स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. अखेर 1960 मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला.
Web Title: Story Marriage Indira Gandhi And Feroze Gandhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..