.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
यः पठति लिखति पश्यति परिपृच्छति पण्डितानुपाश्रयते
तस्य दिवाकरकिरणैः नलिनीदलमिव विकस्यते बुद्धिः।।
अनुवाद : लिहि, अभ्यासी, प्रश्न करी, अवलोकी, विद्वत्संग धरी
बुद्धि तयाची विकसे, सूर्याने फुलणाऱ्या नलिनिपरी
अर्थ : जो वाचन करतो, लिखाण करतो, निरीक्षण करतो, मनात आलेल्या शंका विचारून त्यांचं निरसन करून घेतो, ज्ञानी लोकांच्या सान्निध्यात राहतो त्याची बुद्धी, सूर्यकिरणांमुळे कमळाच्या पाकळ्या ज्याप्रमाणे विकसित होतात, त्याप्रमाणे विकास पावते.