

Suhas Bahulkar's 'Katha Shivchitranchyavyatha Shivsmarakanchya!'
Sakal
मंगेश बरबडे
चित्रकार सुहास बहुळकर यांच्या ‘कथा शिवचित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या!’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित विविध कलाकृती व शिल्पाकृतींची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. प्रख्यात इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांनी छत्रपती शिवरायांचे अस्सल चित्र प्रथम शोधून काढले. त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून वेगळेच चित्र प्रसिद्ध होत होते. बेंद्रे यांनी कॉलिन मेकॅन्झी यांनी प्रसिद्ध केलेल्या खंडातून महाराजांचे चित्र शोधून काढले आणि ते अस्सल चित्र असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केले.