
अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com
कोणताही व्यक्ती हा आपला प्रवास सुखद आणि संस्मरणीय राहावा यासाठी मोटार खरेदी करत असतो. विशेष म्हणजे खरेदीच्या वेळी मोटारीतील वैशिष्ट्याबाबत सजग असतो. कंपन्यादेखील ग्राहकांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी वाहनांत सातत्याने वैशिष्ट्यात भर घालत असतात. अलीकडच्या काळात गुगल मॅप, एअर बॅग, सेन्सर्स यांसारखे महत्त्वाचे फीचर्स जोडलेले असताना आणखी एका फीचर्सची भर पडली असून त्याच्या आकर्षणापोटी ग्राहक मोटार खरेदी करताना दिसतात. ते वैशिष्ट्ये म्हणजे ‘सनरूफ’ होय. सनरूफ म्हणजे मोटारीच्या छतावर ग्लास किंवा मेटलचे सरकते पॅनल. या सुविधेमुळे मोटारीत ताजी हवा आणि प्रकाश येतो. स्मार्ट सनरूफमुळे वाहनांचे सौंदर्य वाढत असले तरी ते आता ‘ड्रीम फीचर’ राहिलेले नाही.