डॉ. एन डी पाटील; वंचितांचे आधारवड

महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा असं आपण म्हणतो, ते एनडींसारख्या अविचल विचारांच्या अग्रणींमुळेच.
डॉ. एन डी पाटील
डॉ. एन डी पाटीलsakal

प्रा. डॉ. एन. डी. पाटील गेली ६० वर्षे महाराष्ट्राच्या कष्टकरी-वंचितांच्या प्रश्‍नांसाठी लढले. पुरोगामी-सत्यशोधकी विचारांचा वारसा घेऊन त्यांनी आपले या राज्यात नेतृत्व सिद्ध केले. महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा असं आपण म्हणतो, ते एनडींसारख्या अविचल विचारांच्या अग्रणींमुळेच. ते कधीच केवळ शेकापच नेते नव्हते तर समस्त वंचित कष्टकरी आंदोलकांचा ते आवाज झाले. त्यांचे निधन अशा सर्व चळवळी आंदोलकांना पोरके करणारे आहे.

डॉ. भारत पाटणकर, श्रमिक मुक्ती दलाचे नेते

महाराष्ट्राच्या राजकारणात एन. डी. सरांचे योगदान विविधांगी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आंदोलनात ते ज्युनिअर होते, तरीही तत्कालीन सर्व नेत्यांच्या प्रभावळीतही त्यांचे अभ्यासू नेतृत्व उजळून निघाले. १९७२ च्या दुष्काळात इस्लामपूर तहसील कार्यालयावरील मोर्चावेळी पोलिस गोळीबारात चार हुतात्मे झाले. त्यानंतरचे त्यांचे राजकारण अवघ्या महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांच्या राजकारणाचा अवकाश सांभाळणारे राहिले. ते पुलोद मंत्रिमंडळात सहकारमंत्री झाले आणि कापूस एकाधिकार खरेदी योजना सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. ते सत्तेत गेले म्हणून त्यांच्यातील क्रांतिकारक कार्यकर्ता कधीच झाकोळला गेला नाही. त्यांच्या वाणीची धार नेहमीच तळपत राहिली. दीर्घकाळ महाराष्ट्राच्या विधान परिषदेत काम करताना त्यांनी विरोधी पक्षांच्या राजकारणाचेही मानदंड उभे केले.

डॉ. एन डी पाटील
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली

माझ्या वैयक्तिक आयुष्यात एन.डी. सरांचा दीर्घकाळाचा सहवास लाभला. माझे वडील क्रांतिवीर बाबूजी आणि आई इंदूताई यांच्याशी त्यांचा दीर्घ स्नेह होता. एनडी त्यांना गुरुस्थानी मानायचे. विधानसभा निवडणुकीत माझ्या तरुण वयात मी त्यांचा प्रचारक होतो. तिथून ते आतापर्यंतच्या सुरू असलेल्या प्रत्येक वंचितांच्या पाण्याच्या लढ्यात मला त्यांची सोबत मिळाली. माझ्या वैयक्तिक सुख-दु:खातही ते प्रकृतीच्या अनंत अडचणी बाजूला सारून आले. मला धीर दिला. अंतरीचा ओढा असल्याशिवाय ते होत नाही. अगदी अलीकडे म्हणजे गेल्या २५ वर्षांच्या त्यांच्या राजकारणात ते राज्यभरातील कष्टकरी, वंचित, दलितांचे, विविध पुरोगामी पक्षांच्या आंदोलकांचे आवाज झाले. पक्षाच्या मर्यादा त्यांनी कधीच ओलांडल्या.

डॉ. एन डी पाटील
नाशिक : चार्जिंग स्टेशनसाठी ‘रिलायन्स’, मात्र मनपाला हवाय ‘टाटा’

सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या पाण्यासाठीच्या लढ्यात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडींसह सर्वांबरोबर पहाडासारखे राहिले. या लढ्यामुळेच सिंचनाच्या धोरणापासूनचे अनेक मुद्दे निकालात निघाले. काँग्रेस आघाडी सरकारात शेकापही सहभागी होता. या काळातच पाण्याच्या मालकीचे व वीजदराची आंदोलने झाली आणि त्यातून धोरणे आकाराला आली. सरकारने जलसंपत्ती नियमन आणि प्राधिकरणाची स्थापना केल्यावर त्यासाठी सरकारचे धोरण ठरविताना तयार केलेली टिप्पणी एनडी सरांच्या मार्गदर्शनाखालीच झाली. आजच्या समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणाचीच त्याला बैठक होती.

शेतकऱ्यांना पाण्याचे परवडणारे दर आणि वीज सवलत हे आमच्या चळवळीचे यश आहे आणि ते त्यांच्या नेतृत्वाचेही यश आहे. आजही ते राज्याच्या पाणी धोरण संघर्ष मंचाचे निमंत्रक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मी सहनिमंत्रक म्हणून काम करीत होतो. मोजून पाणी देण्याच्या पुरोगामी धोरणाचेही ते पुरस्कर्ते राहिले. त्याचवेळी इरिगेशन फेडरेशनचेही त्यांनी नेतृत्व केले. रायगड जिल्ह्यातील सेझविरोधी आंदोलनातून त्यांनी भांडवलदारांना पळवून लावले. तो देशातील पहिला सेझविरोधी यशस्वी लढा होता. एका अविचल निष्ठेने ते अखेरपर्यंत लढत राहिले आणि समस्त वंचितांचे आवाज झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com