Surendran Nair Art : मिथक, स्मृती आणि विनोदातून जग पाहणारे चित्रकार; सुरेंद्रन नायर यांची अनोखी कला

Indian Contemporary Artist : भारतीय चित्रकार सुरेंद्रन नायर यांच्या कलाकृती मिथक, विनोद, स्मृती आणि कल्पनाशक्तीच्या माध्यमातून जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात; त्यांच्या चित्रांमध्ये अंतर्मनाचा गूढ प्रवास उलगडतो.
Indian Contemporary Artist

Indian Contemporary Artist

esakal

Updated on

हर्ष भटकळ - saptrang@esakal.com

‘जे आहे त्याहून निराळे काही करण्याची आस बाळगणे हेच महत्त्वाचे आहे.’ असे सांगणाऱ्या सुरेंद्नन नायर यांच्या कलाकृतींमध्ये जगाकडे पाहण्याची दृष्टी आहे. त्यांच्या कामात कल्पना भरारी सातत्याने दिसते. त्यांच्या चित्रांत दिसणाऱ्या व्यक्ती ह्या अंतर्मनात दंग असतात. त्यांना बाह्य जगाची जाणीव नसते. ती रमलेली असतात विचारात, स्मरणात आणि प्रतिकृती यांत. राजकीय परिस्थितीची जाण असतेच पण ती उघड स्वरूपात नाही. त्यांच्या कलाकृती आपल्या कल्पनाशक्तीला चालना देतात.

मिथक, रूढी आणि विनोद हे सुरेंद्रन नायर यांच्यासाठी फक्त चित्रे काढण्याचे विषय नाहीत तर जगाकडे पाहण्याची दृष्टी आहे. सध्याच्या भारतीय कलाकारांत सुरेंद्रन नायर यांना विशेष स्थान आहे. चार दशकाहून अधिक काळ त्यांच्या कलाकृती या जगभरातल्या म्युझियम आणि गॅलरी यांतून प्रदर्शित झाल्या आहेत. संग्राहक आणि कलासमीक्षक त्यांच्याकडे अस्सल भारतीय चित्रकार म्हणून पाहतात. फक्त त्यांच्याशी बोलताना मात्र त्यांच्या कलेसंबंधी मोठमोठ्या कल्पना किंवा साक्षात्कारी विधाने ऐकायला मिळत नाही. ते सांगत असतात त्या फक्त गोष्टीच आणि तेच योग्य वाटते, कारण गोष्टीच तर त्यांना सुरुवातीपासून मार्ग दाखवत आल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com