

Suryakumar Yadav Cricket Stats
esakal
अपयशाच्या फेऱ्यातून कोणाची सुटका नाही. सूर्योदयाप्रमाणे सूर्यास्त होत असतो; पण त्या रात्रीनंतरचे दिवस वारंवार अपयशच घेऊन आले की कासावीस व्हायला होते. महान खेळाडूंच्या श्रेणीतील खेळाडू काळोख्या रात्रीही प्रकाश निर्माण करतात, म्हणूनच ते दिग्गज समजले जातात; पण एखाद्या खेळाडूचे अपयश लांबले की त्याचे स्वतःचे आणि संघाचेही नुकसान होत असते.
ऑस्ट्रेलियाचा अपवाद सोडला तर व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये सलग दोन आयसीसी करंडक जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघानेच केला आहे आणि तोही रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली. याच श्रेणीतील आणखी एक प्रतिष्ठेची टी-२० विश्वकरंडक स्पर्धा भारतात होते. काही दिवसांवर ही स्पर्धा आली आहे. भारतात स्पर्धा होत असली की निश्चितच विजेतेपदासाठी पहिली पसंती भारतीय संघाला मिळते. २०२३मध्ये असाच जोर सुरू होता. एकदिवसीय विश्वकरंडकापर्यंत हातही पोहोचले होते; परंतु अंतिम सामन्यात दैव रुसले आणि अख्खा देश दुःखसागरात बुडाला होता. हा इतिहास झाला, आपण सकारात्मकतेचा विचार करायला हवा.