Marathi Book Review : ‘दीपशिखा’तून उलगडतो सुषमा स्वराज यांचा राजकीय प्रवास आणि आयुष्यातील अनोळखी पैलू

Sushma Swaraj Biography : सुषमा स्वराज यांच्या राजकीय प्रवासापासून प्रभावी वक्तृत्वापर्यंत आणि वैयक्तिक आयुष्यापासून परराष्ट्रमंत्री म्हणून केलेल्या कामापर्यंतचा प्रवास अर्चना देव यांच्या ‘दीपशिखा’ या चरित्रात्मक कादंबरीतून उलगडतो.
Marathi Book Review

Marathi Book Review

esakal

Updated on: 

संपदा सोवनी - sampada.sovani@esakal.com

राजकीय विचारसरणी कोणतीही असली, तरी सुषमा स्वराज यांचे नाव निघाल्यावर ‘उत्कृष्ट वक्तृत्व’ हे शब्द सार्वत्रिकरीत्या व्यक्त केले जातात. ‘आज त्यांचे नेतृत्व आणि प्रभावी प्रशासन हवे होते,’ असेही अनेकांकडून ऐकायला मिळते. विद्यार्थी संघटनेतून सुरुवात करून एकेक टप्पा पार करत परराष्ट्रमंत्री झालेल्या आणि त्या पदावर असताना केलेल्या कामाबद्दल मोठी प्रशंसा मिळवलेल्या सुषमा स्वराज यांना ‘दीपशिखा’ हे नाव शोभून दिसावे असे आहे! या नावाची अर्चना देव यांची चरित्रात्मक कादंबरी सुषमा स्वराज यांचा संपूर्ण प्रवास गोष्टीरूप भाषेत मांडते. रूढ कादंबऱ्यांसारखी या पुस्तकात कथा एकसंध रूपाने आलेली नाही; परंतु चरित्रात्मक माहितीच्या तुकड्यांमधून काही अप्रचलित माहिती वाचकांना मिळते.

हरियाणातील अंबाला येथे १४ फेब्रुवारी १९५२ मध्ये सुषमा स्वराज यांचा जन्म झाला. पहिल्या मुलानंतर मुलीची हौस पूर्ण झाल्यामुळे आई-वडिलांना झालेला आनंद आणि लहानपणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाशी झालेला परिचय, इथपासून ही कादंबरी सुरू होते. सुषमा स्वराज यांच्या बाबतीतल्या कमी माहिती असलेल्या गोष्टी या भागात आहेत. उदा. चंडीगडच्या विधी महाविद्यालयात शिकताना एक टीम म्हणून द्विभाषी वादविवाद स्पर्धा गाजवणारे सुषमा स्वराज (हिंदी) व स्वराज कौशल (इंग्लिश) आयुष्यभरासाठीचे जोडीदार कसे झाले याची गोष्ट. १९७५ च्या आणीबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांना पाठिंबा देऊन आंदोलनात उतरण्याची दोघांचीही इच्छा होती. पण ‘अविवाहित असताना आंदोलनात एकत्र दिसलात तर लोक नावे ठेवतील,’ असा मुद्दा सुषमा यांच्या वडिलांनी उपस्थित केला. वैचारिक मैत्री असलेले हे दोघे आणीबाणी सुरू झाल्यावर दोनच आठवड्यांत लग्नबंधनात अडकले. कौशल हे समाजवादी विचारांचे, तर सुषमा अभाविपची पार्श्‍वभूमी असलेल्या. या दाम्पत्याने सात वर्षे सोबत केलेली वकिली, नंतर सुषमा यांचे राजकारणात सक्रिय होणे आणि त्यांच्या सहजीवनाबद्दल या पुस्तकात वाचायला मिळते.

Marathi Book Review
Premium|Rahul Gandhi vs Narendra Modi : मोदींना राहुल गांधी आव्हान देऊ शकतील ?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com