

Rahul Gandhi vs Narendra Modi
esakal
प्रियदर्शन - saptrang@esakal.com
भारतीय राजकारणात एकेकाळी अजिंक्य वाटणारा भाजप पहिल्यांदाच असुरक्षित आणि आव्हानांना सामोरा जाताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गारुडही आता सरकारच्या सत्तेत टिकून राहण्याची हमी देऊ शकत नाही. मोदींना पर्याय नाही, हा दावा आता निर्विवाद सत्य राहिलेला नाही. पण त्या पर्यायाला सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी केवळ लोकसमर्थन पुरेसे ठरणार नाही; संघटनात्मक ताकद, राजकीय इच्छाशक्ती आणि विरोधकांची एकजूटही तितकीच निर्णायक ठरेल.
भारतीय राजकारणात गेल्या काही काळापासून एक मोठा बदल दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आजवर जवळजवळ कुठल्याही आव्हानांपलीकडची मानली जात होती. मात्र, आता विरोधकांकडून त्यांच्या लोकप्रियतेला थेट आव्हान दिले जात आहे. दिल्लीतील जंतरमंतरसह देशातील विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अचानक एक प्रश्न चर्चेत आला आहे तो म्हणजे राहुल गांधी पंतप्रधान मोदींची जागा घेऊ शकतील का?