
सीरियातलं असाद यांचं सरकार अल कायदाच्या एका फांदीनं (हयात तहरीर अल शाम) पाडलं. असाद सीरियन होते आणि हयातही सीरियन आहे. सत्ताबदल हा देशी आहे, यादवी युद्धाचा भाग आहे. खरं म्हणजे हे यादवी युद्ध असल्यानं प्रकरण सीरियाचं अंतर्गत असायला हवं, त्याचा परिणाम जगावर व्हायचं कारण नाही. पण तसं नाहीये.