झेल पकडा; कप जिंका!

एकदिवसीय असो टी-२० विश्वकरंडक स्पर्धा, आयसीसीच्या अशा स्पर्धांची तयारी करताना फलंदाजी आणि गोलंदाजीवर अधिक भर असतो.
suryakumar yadav

suryakumar yadav

sakal

Updated on

कालपासून सुरू झालेल्या यंदाच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ विजेतेपदाचा प्रमुख दावेदार समजला जातोय. तो अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यासारख्या बेधडक फलंदाजांमुळे. गोलंदाजीत जसप्रीत बुमरासारखे क्षेपणास्त्र आहे. याच संघाने गेल्या महिनाभरात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध मिळून सातपैकी पाच सामन्यांत विजय मिळवला आणि आपली क्षमता दाखवून दिली. सर्व काही योग्य दिशेने पावले टाकली जात आहेत. आता केवळ क्षेत्ररक्षणाची बाजू चोख करायला हवी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com