

Ancient Temples
sakal
ओंकार वर्तले-ovartale@gmail.com
मराठेशाहीतील पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना इनामात मिळालेलं ‘तळेगाव’. त्यामुळेच या नावाचं ‘तळेगाव दाभाडे’ असं नामकरण लोकांच्या मुखी झालं. मावळ तालुक्यातील एक महत्त्वाचं शहर... तसंच मुंबई-पुणे या दोन शहरांदरम्यानच्या रस्ते आणि लोहमार्ग या दोहोंवरील मध्यभागी महत्त्वाचा थांबा असलेलं आवडीचं ठिकाण. तळेगावच्या वेशीवरून आपण जुन्या महामार्गाद्वारे बऱ्याचदा जात असतो. त्या वेळी तळेगावची भौगोलिक ओळख असलेली दोन तळी आपलं लक्ष वेधून घेतात. तळेगावला ओळखण्याची ही महत्त्वाची खूण. या तळेगावात इतिहासाच्या चष्म्यातून पाहण्यासारखं बरंच काही आहे.