
शैलेश नागवेकर - shailesh.nagvekar@esakal.com
न्यूझीलंडविरुद्ध व्हाइटवॉश, ऑस्ट्रेलियात मोठी हार आणि इंग्लंडविरुद्ध तीनपैकी दोन पराभव - असे मिळून भारतीय संघाने अलीकडील ११ कसोटींमध्ये आठ पराभव स्वीकारले आहेत. विजय केवळ दोनच वेळा मिळाले. जर आकडेवारीच्या आधारावर खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण केले जात असेल, तर तोच मापदंड सपोर्ट स्टाफसाठीही लावला पाहिजे.