अनुभव समाजाच्या दातृत्वाचा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashodhan
अनुभव समाजाच्या दातृत्वाचा...

अनुभव समाजाच्या दातृत्वाचा...

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाईटला उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडींगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला असून ‘सोशल फॉर अॅक्शन’ या अभियानांतर्गत चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमाची माहिती दर रविवारी दिली जाते.

‘सोशल फॉर अॅक्शन’ या अभियानांतर्गत आत्तापर्यंत माहेर (पुणे) , माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान (धुळे), एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यास (रत्नागिरी कुडाळ प्रकल्प), भारत जोडो युवा अकादमी (नांदेड), प्रार्थना फाउंडेशन (सोलापूर) व यशोधन ट्रस्ट (सातारा) या सहा स्वयंसेवी संस्थांचे अभियान पूर्ण करून, त्या - त्या संस्थांना निधी वर्ग केला आहे. या विविध संस्थांच्या कामांचा थोडक्यात आढावा व त्यांना मिळालेल्या मदतीनंतरची त्यांची वाटचाल

यशोधन ट्रस्ट : सातारा रोडवरील वाई येथील अनाथ व मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या ''यशोधन ट्रस्ट'' या स्वयंसेवी संस्थेबद्दल समाजभान सदरात माहिती प्रसिद्ध केली होती. निराधार - बेघर व मनोरुग्णांच्या आरोग्य तपासणी व औषध - उपचारांच्या वार्षिक खर्चासाठी व नवीन आश्रम इमारत बांधकामाकरीता ‘यशोधन ट्रस्ट'' संस्थेच्या मदतीसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सध्या आश्रमात ६० मानसिक रुग्ण राहत असून,आश्रमाच्या नवीन इमारतीचे बांधकाम देखील पूर्ण झाले आहे.

प्रार्थना फाउंडेशन : सोलापूर जिल्ह्यातील मोरवंची येथे गरीब कमी उत्पन्न गटातील तसेच निराधार , बेघर व भिक्षेकरी मुलांसाठी ''प्रार्थना फाउंडेशन'' च्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘वंचितांची शाळा-एक पाऊल प्रगतीकडे’ प्रकल्प चालविणाऱ्या अनंतअम्मा कृष्णय्यानं व प्रसाद मोहिते या तरुण दाम्पत्य विषयी समाजभान सदरात माहिती प्रसिद्ध केली होती. ‘वंचितांची शाळा-एक पाऊल प्रगतीकडे’ या प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावरची बेघर आणि निराधार ३०० मुलं-मुली आणि वृद्धांसाठी '' प्रार्थना बालग्राम '' हा निवासी प्रकल्पाच्या इमारत बांधकामासाठी '' प्रार्थना फाउंडेशन '' संस्थेच्या च्या मदतीसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. " सोशल फॉर अॅक्शन " अभियानाच्या व अनेक देणगीदारांच्या माध्यमातून सध्या '' प्रार्थना बालग्राम '' प्रकल्पाच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

एकलव्य बालशिक्षण आरोग्य न्यास : आर्थिक दृष्ट्या मागास, निराधार व शाळाबाह्य मुलांच्या समस्यांचा आवाका लक्षात घेऊन व त्यांना आवश्यक असणाऱ्या मदतीची गरज समजावून घेऊन , वेताळ बांबर्डे ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे संस्थेला मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह उभारायचे होते. वसतिगृहाच्या इमारत बांधकामासाठी व इतर भौतिक साधनांसाठी '' एकलव्य बालशिक्षण आरोग्य न्यास '' संस्थेच्या च्या मदतीसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘सोशल फॉर अॅक्शन’ अभियानाच्या व अनेक देणगीदारांच्या माध्यमातून एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास या संस्थेच्या वसतिगृहाचे काम पूर्णत्वास आले आहे. यात संपूर्ण वसतिगृहाची इमारत, बहुउद्ददेशीय सभागृह बांधून तयार आहे. या वसतीगृहाच्या इमारतीत मुला - मुलींच्या निवासाच्या खोल्या, अभ्यासवर्ग, वाचनालय, स्वयंपाकघर, याशिवाय मूलभूत सोयींमध्ये पाण्यासाठी बोअर वेल व सिमेंटची टाकी , स्वच्छतागृह इत्यादी सोयी - सुविधा करण्यात आल्या आहेत.

शुभांगी माने : शुभांगी माने या चोवीस वर्षीय तरुणीची माहिती प्रसिद्ध करून, तरुणीच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘ सोशल फॉर अॅक्शन’ अभियानाच्या व अनेक संस्था व देणगीदारांच्या माध्यमातून शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारी रक्कम माने कुटुंबीयांकडे जमा झाली असून, हॉस्पिटलकडे यकृत उपलब्ध झाल्यावर शुभांगी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

कशी कराल मदत ...

सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन विविध संस्थांच्या सामाजिक उपक्रमांची आपण माहिती घेऊ शकता . तसेच समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक सामाजिक उपक्रमांची उपक्रमाची घेऊन , डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल. व्हाट्सअँप क्रमांक - ८६०५०१७३६६

Web Title: Team Sfa Writes Social For Action Sakal Social Foundation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Team SFAsaptarang