Premium|Tamil Nadu cinema politics : तमिळनाडूत थलपती विजयचं वादळ: दोन वर्षांत पक्ष स्थापन; सिनेमा, फॅन क्लब आणि जनचळवळीवर उभी नवी सत्ता

Tamilaga Vettri Kazhagam 2026 Election Results : तमिळनाडू विधानसभेत थलपती विजय यांच्या 'टीव्हीके' पक्षाने १०८ जागा जिंकून प्रस्थापित द्रविड राजकारणाला धक्का दिला असून, मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा पराभव करत चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याने राजकारणात पुन्हा एकदा सत्तेचे समीकरण बदलून दाखवले आहे.
Tamil Nadu cinema politics

Tamil Nadu cinema politics

esakal

Updated on

निळू दामले - saptrang@esakal.com

तमिळनाडूत २०२४मध्ये स्थापन झालेल्या तमीळ वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षानं २०२६ मधल्या २३४ सदस्यांच्या तमिळनाडू विधानसभेत १०८ जागा मिळवणं ही सामान्य गोष्ट नव्हे. थलपती विजय (सी जोसेफ विजय) यांनी ती करामत करून दाखवलीय. स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं विजय यांना आमदार गोळा करावे लागतील, गोळा झाले तर ते टिकवून ठेवावे लागतील. निवडणुका जिंकणं हे कौशल्य विजय यांच्या जवळ आहे, आता सत्ता टिकवण्याचं कौशल्य ते कसं आत्मसात करतात, ते पाहायचं आहे. विजय यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे. विधानसभेच्या या निवडणुकीत मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा ८७०० मतांनी पराभव झाला. स्टॅलिन हे द्रमुक या १९६७पासून आलटून-पालटून सत्तेत असलेल्या तमिळनाडूत रुजलेल्या द्रविड पार्टीचे नेते होते. स्टॅलिन यांना करुणानिधी यांचा वारसा लाभला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com