Aletsch Glacier Alps : आल्प्समधील अलेट्श हिमनदी; बर्फाचा महासागर, युरोपचा जीवनदायी जलसाठा आणि हवामान बदलाची जिवंत नोंद

Glaciers of Europe : स्वित्झर्लंडच्या आल्प्समधील 'अलेट्श' ही युरोपमधील सर्वात मोठी आणि भव्य हिमनदी असून ती निसर्गाचा एक जिवंत चमत्कार आहे. जंगफ्राऊ शिखरांच्या कुशीत उगम पावणारा हा बर्फाचा अथांग महासागर गिर्यारोहकांसाठी एक गूढ आणि चित्तवेधक अनुभव ठरतो.
Aletsch Glacier Alps

Aletsch Glacier Alps

esakal

Updated on

उमेश झिरपे - umzirpe@gmail.com

हिमनदीवर चालताना प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागतं. वरून सपाट वाटणारा पृष्ठभाग आतून अस्थिर असू शकतो. काही ठिकाणी बर्फ घट्ट असतो, तर काही ठिकाणी तो पोकळ असतो. त्यामुळे हिमनदी म्हणजे केवळ सौंदर्याचा अनुभव नसून एक गंभीर, सजगता मागणारा परिसर आहे. तिच्या बर्फात इतिहास आहे, तिच्या पाण्यात वर्तमान आहे आणि तिच्या बदलांमध्ये भविष्यातील संकेत आहेत. म्हणूनच ती खऱ्या अर्थाने जीवनदायिनी आहे.

हिमालयात अनेक वर्षे घालवल्यानंतर मनात एक प्रतिमा कायमची ठसते, बर्फ म्हणजे स्थिरता नाही, तर संथ गतीने चालणारा प्रवास. वरून शांत, पांढरा आणि निश्चल दिसणारा हा बर्फ आतून सतत वाहत असतो. गंगोत्री, खुम्बू किंवा मिलम यांसारख्या हिमनद्या पाहताना आपण त्या प्रवासाचे साक्षीदार होतो. पण जेव्हा आपण हिमालयाच्या पलीकडे, युरोपच्या आल्प्स पर्वतरांगेत प्रवेश करतो, तेव्हा हिमनद्यांचं रूप वेगळ्याच भव्यतेने समोर येतं. येथे हिमनदी केवळ दऱ्यांतून वाहणारी नदी नसते... ती जणू बर्फाचा एक अथांग महासागर भासते. अलेट्श हिमनदी हा त्या अनुभवाचा सर्वोच्च बिंदू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com