america gun culture
sakal
‘वेपन्स’ ही एक सरळसोट कथा नाही. हा चित्रपट अनेक पात्रांच्या जीवनात घडणाऱ्या घटनांमधून हळूहळू आकार घेतो. या रचनेद्वारे अमेरिकन समाजाचं तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेलं वास्तव दिसतं. तरुण शिक्षिका (ज्युलिया गार्नर), पोलिस अधिकारी (ऑल्डन एरनराइक), शाळेत शिकणारी मुलं, उपनगरात राहणारा कुटुंबवत्सल नागरिक (जॉश ब्रॉलिन) अशा प्रत्येक पात्राच्या जगण्यावर एक अस्वस्थ छाया पसरलेली आहे.