
Childhood Memories
sakal
ऋचा थत्ते-rucha19feb@gmail.com
शाळेची घंटा झाली आणि स्पीकरवरून प्रार्थनाही सुरू झाली. आम्हाला डोळे मिटून प्रार्थना फक्त ऐकायची असायची; पण त्यातही किती चुळबूळ. त्या दिवशी एका मुलीचं नाव सांगत मी बाईंना म्हटलं, ‘‘बाई, प्रार्थनेला तिचे डोळे उघडे होते.’’ ‘‘हे तुला डोळे मिटून कसं कळलं?’’ बाईंनी मलाच पकडलं. आणि खरंच डोळे किलकिले करून मी सगळीकडे पाहत होते.