

Role of Saturn in Character Building
esakal
श्रीराम भट- saptrang@esakal.com
माणूस हा एक पांथस्थच म्हणावा लागेल आणि या माणसाच्या पांथस्थपणाशीच शनी या ग्रहाचा संबंध येतो! पथ आणि पथावर चालणारा पांथस्थ विशिष्ट पथ्ये पाळतच किंवा विशिष्ट नियम अनुसरूनच पथावरून वाटचाल करत असतो. अर्थातच ही शनैःही, शनैःही वाटचाल पावलांनीच होत असते. पत्रिकेतील शनीचा संबंध या पावलांशीच येत असतो. ‘घरात बसलेला, चालणारा किंवा आडवलेला माणूस आणि घराबाहेर पडणारा माणूस’ या माणसाच्या अवस्था मोठ्या विचार करायला लावणाऱ्या आहेत. अर्थातच ‘त्या’ मोठ्या चिंतनीय विषय होऊ शकतात. माणसाची काया, वाचा आणि मन या गोष्टी किंवा ही माध्यमे सतत घरात आणि घराबाहेर डोकावत किंवा ती तशी वाटचाल करतच असतात.