

Astrology & power struggle
esakal
श्रीराम भट - saptrang@esakal.com
माणसाच्या अहंकारजन्य सत्तासंघर्षातून माणसाचे तथाकथित महदाकाशातील अवकाश घरी आणि दारी शॉर्टसर्किटसारखे विस्फोटित होत असते. वास्तविक माणसाच्या घरकुलाचे अवकाश हे ज्ञानेश्वरांच्या भक्तिभावातून ‘भक्तभावभवन दीपासारखे’ भावभक्तीचे मंदिरच व्हायला पाहिजे. अर्थातच त्या सर्वेश्वर भगवंतानेच त्याला जगण्यासाठी स्पंदित होण्यासाठी ते अवकाश दिलेले असते. अर्थातच त्या भगवंताच्या आकाशानेच माणसाला श्वास घेण्यासाठी अवकाश दिलेले असते. हॉस्पिटलमधील तथाकथित आयसीयूसुद्धा याच भगवंताच्या आकाशात ऑपरेट होत असते की हो.