- मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (निवृत्त), mohinigarge2007@gmail.com
‘जय माँ काली, आयो गुरखाली!’ असा जयघोष करून देवीप्रसाद पुढे सरसावला. त्याच्या हातातील गोरखा सैनिकाची ओळख - खुकरी अशी काही वेगात चालू लागली, की समोरच्या चीनी सैन्याचं मोठं सामूहिक बळही त्याला अडवू शकलं नाही. दारुगोळा संपल्यावर खुकरीच्या साह्याने पाच जणांना कंठस्नान घालत त्याने विजयाची मुहूर्तमेढ रोवली.