
- मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (निवृत्त), saptrang@esakal.com
वर्ष १९४८. कडाक्याच्या थंडीचा नोव्हेंबर महिना. निसर्ग प्रतिकूल तर अखंड साथीला होतं डोक्यावर मृत्यूचं सावट. पाकिस्तानी सैन्याने मोठ्या शस्त्रसाठ्याच्या जोरावर अतिशय क्लिष्ट अशा पद्धतीने डोंगरांच्या कडेकपाऱ्यांमध्ये बळकट मोर्चे बांधलेले होते. जवळ जाणाऱ्या भारतीय सैन्यावर सातत्याने गोळीबार होत होता. मजबूत ठाण मांडून बसलेला हा चिवट शत्रू आणि समोर आव्हानांची मालिका. तेवढ्यात भारतीय सैन्याकडून रणगाड्यावरच्या तोफांचा जोरदार मारा सुरू झाला.