गोंधळ, ताण आणि अस्वस्थता

गोंधळलेल्या रेस्टॉरंटकिचनमध्ये मानवी नातेसंबंध, मानसिक संघर्ष आणि भावनात्मक गुंतागुंत यांची प्रचंड गतीने उलगडणारी कहाणी म्हणजे ‘द बेअर’.
The Bear FX

The Bear FX

Sakal

Updated on

अक्षय शेलार - अक्षय शेलार

क्रिस्टफर स्टोअररने निर्माण केलेली ‘द बेअर’ ही मालिका पाहताना सर्वात आधी लक्ष वेधून घेते ती तिच्या दृश्यशैलीकडे. एका रेस्टॉरंटच्या गजबजलेल्या स्वयंपाकघरात सतत चालणारी धावपळ, कोलाहल, तणाव आणि एकमेकांवर खेकसणारे आवाज हे सगळं केवळ कथानकाचा भाग न राहता मालिकेच्या चित्रीकरणाची शैलीमध्ये झिरपतात. ही शैली प्रेक्षकांना तिथल्या अवकाशात खेचते. लहान-लहान शॉट्स, जलद कट्स, जवळजवळ घुसमटवणारे कॅमेरा-वर्क आणि किचनमधल्या घामेजलेल्या चेहऱ्यांवर चिकटून राहणारे क्लोज-अप या सगळ्यामुळे प्रेक्षकांना रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरातील त्या कडवट, वेगवान वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव येतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com