
गौरी देशपांडे- gaurisdeshpande1294@gmail.com
त्या रात्री जस्मिनच्या स्वप्नात आलं की, ती सिंहासारखी शूर झाली आहे. बेनच्या स्वप्नात आलं की, तो माकडासारखा फांद्यांवर उड्या मारतोय. ॲडमच्या स्वप्नात तर तो जिराफासारखा एकदम उंच झाला होता. या तीनही ‘बेस्ट फ्रेंड्स’च्या स्वप्नात एकाच रात्री प्राणी दिसायचं कारण असं की, त्याच दिवशी ते तिघे मिळून गेले होते प्राणिसंग्रहालयात. तिथे गेल्यावर त्यांनी धमाल केली खरी, पण तिथपर्यंत ते कसे पोहोचले, याची गोष्ट जरा वेगळीच आहे बरं का!