- गिरिजा दुधाट, dayadconsultancies@gmail.com
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. पृथ्वीच्या अव्याहत सृजनचक्रात एका कालसर्गात काही अनोखे प्राणी उत्क्रांत होऊ पाहत होते. तसे पृथ्वीवर बाकीही प्राणी-पक्षी तेव्हा होतेच...जलचर, भूचर, व्योमचर, वगैरे. तसे हिंडून-फिरून, खाऊन-पिऊन सुखी जीव; पण हे नवे प्राणी मात्र जरासे वेगळे (विचित्र?) होते. आधी चारचौघां प्राण्यांसारख्या राहणाऱ्या या प्राण्यांनी एकदा सामूहिकरीत्या ठरवले...‘बास झाले आता चार पाय. आता आम्ही दोन पायांवर चालणार! (चाला, तुम्हाला कोण अडवणार?). आणि हो, आम्ही आमच्या खांद्यावर असलेला भागपण वापरणार! (एकदाचा!).’