
Travel Stories
Sakal
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
सुमारे १५ वर्षांपूर्वी रोजच्या सवयीप्रमाणे ऑफिसला निघाले; पण त्या दिवशी सुट्टी होती. त्या दिवसभर मनाजोगती भटकंती करायला मिळाली. तो दिवस मी आजही मनात जपलाय मोरपिसासारखा. या पूर्ण दिवसात मनातली सुप्त इच्छा पूर्ण झालीच, शिवाय पुण्याची ओळख म्हणता येतील अशा मोजक्या ठिकाणांना भेट दिली गेली.