
confused mind
sakal
गिरीश कुलकर्णी -editor@esakal.com
बंडूनं थकून मोबाइल फोन बंद केला. बाजूला ठेवला. घरातला शेवटचा प्रकाशस्रोत मालवला गेला. आता त्या तीनखणी घरात आणि बंडूच्या मनात अंधाराने अंग पसरले. बंडूने अगतिकतेने डोळे मिटले. बराच वेळ स्क्रोलिंग केल्याने पापण्यांच्या आत अजूनही रंगीबेरंगी प्रकाश चकत्या फिरत होत्या. डोक्यातील विचारचक्र आणि फिरणाऱ्या चकत्या यांची गती असह्य होत होती. तरीही कष्टानं बंडू डोळे मिटून राहिला.