
अरविंद रेणापूरकर- arvind.renapurkar@esakal.com
आजच्या काळात मोटार खरेदी केवळ छानछौकीसाठी नाही तर गरजेसाठी होऊ लागली आहे. याच अनुषंगाने बहुतांश नागरिक आपल्या पोर्टफोलिओमध्ये मोटार खरेदी करण्यास प्राधान्य देताना दिसून येतात. अर्थात, या खरेदीत मोटारीचा आकार आणि उंची महत्त्वाचा घटक. या निकषावर एमपीव्ही(मल्टी पर्पज व्हेईकल) प्रकारातील मोटारी तंतोतंत लागू होतात. यालाच ‘फॅमिली कार’ असेही म्हणतात. सहा ते सात जण बसतील एवढी एेसपैस जागा आणि साहित्य सामावून घेणाऱ्या एमपीव्हींनी देशभरातील एका कुटुंबाची प्रवासाची गरज भागवताना कौटुंबिक नाते दृढ करण्यातही योगदान दिले आहे.