
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
पक्षी घरटं बांधण्यासाठी सामग्री गोळा करतात ती प्रक्रिया खरंच पाहण्यासारखी असते. शहरात तर असा अनुभव क्वचितच येतो; पण ते दृश्य सुखावून जातं आणि म्हणूनच आपण माणसंही ‘काडी काडी जमवून घर बांधलं’ असा शब्दप्रयोग करत असतो. ‘रोटी, कपडा और मकान’ यापैकी ‘मकान’साठी अनेकांची आयुष्यातील अनेक वर्षं खर्ची जाऊ शकतात. अशा या घरात शांती आहे, तर सुख आहे.