
Anwa Temple
sakal
ओंकार वर्तले-ovartale@gmail.com
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अन्वा या नावाचे एक छोटे खेडे आहे. महाराष्ट्राचे कलावैभव असलेल्या अजंठापासून सोळा किलोमीटर अंतरावर तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडपासून अवघ्या सत्तावीस किलोमीटरवर हे गाव आहे. छत्रपती संभाजीनगर-अजिंठा रोडवरील गोळेगावपासून या गावात जाता येते.